प्रशासन

Operation Sindoor : युद्धजन्य स्थितीत नागपूर मेडिकल सज्ज

Indian Army : ऑपरेशन सिंदूरनंतर देशभर राष्ट्रभक्तीचा धगधगता ज्वालामुखी

Post View : 36

Author

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निर्णायक हल्ला करत देशभरात उच्चस्तरीय अलर्ट जारी केला आहे. या कारवाईत नागपूर शहर महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला मुळासकट नष्ट करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची लाट उसळली आहे. ही कारवाई केवळ सैनिकी रणनीती नव्हे, तर देशाच्या सामर्थ्याचा जाहीर पुरावाच ठरली आहे. विविध माध्यमांतून आणि जनतेतून या ऑपरेशनचे जोरदार समर्थन होत आहे.

धडाकेबाज कारवाईत महाराष्ट्रातील नागपूर शहराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नागपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या नागास्त्र-1 या आत्मघाती ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे नागपूरचं नाव संपूर्ण देशभरात गाजत आहे. संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नागपूरचं योगदान आता सर्वदूर पोहोचत आहे.

Operation Sindoor : नागपूरचा पिनाका सीमारेषेवर सज्ज

आपत्कालीन उपचार यंत्रणा

सुरक्षा मोहिमांबरोबरच नागपूरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयही युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झालं आहे. येथे विशेष डिजास्टर वॉर्ड तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय करण्यात आली आहे.

युद्धजन्य आपत्तीत जखमी जवानांवर त्वरीत उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय पातळीवर अनेक तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने तात्काळ अलर्ट मोड स्वीकारत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. देशातील 32 प्रमुख विमानतळांवरील नागरी उड्डाणे आणि 25 हवाई मार्ग 9 ते 14 मे 2025 दरम्यान तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Operation Sindoor : इस्रोचे उपग्रह बनले भारताचे गुप्त शस्त्र

सज्जता संघटीत निर्णय

युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही सुरक्षात्मक पावले उचलली आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. सध्या देशभरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट लागू करण्यात आले आहे.

तिन्ही संरक्षण दल युद्धजन्य परिस्थितीत कोणताही धोका परतवून लावण्यासाठी सज्ज आहेत. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने केवळ सैन्य शक्तीच नव्हे, तर सुसंगत नियोजन, तांत्रिक प्रगती आणि राष्ट्रीय एकतेचं दर्शन घडवलं आहे. संपूर्ण देश आता एका सुरात म्हणतोय. भारत सज्ज आहे, सुरक्षित आहे. निर्णायक कारवाईसाठी कटिबद्ध आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!