
नागपुरात हिंदू-मुस्लिम वाद चिघळल्यानंतर एनसीपी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपवर धर्मवादाचा आरोप करत त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून 17 मार्च रोजी रात्री मोठा तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये वाद उफाळून आल्याने परिस्थिती चिघळली. दोन्ही गट आमने-सामने आल्यावर शहरात दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराने उग्र स्वरूप धारण केले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. नागपूरच्या विविध भागांत जमावबंदी करण्यात आले आहे.
नागपुरातील या तणावपूर्ण घटनेवर राजकीय नेत्यांनीही आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘नागपूर कधीही दंगलीसाठी ओळखले जाणारे शहर नव्हते. मात्र, सध्या संपूर्ण राज्यात अशा घटना वाढताना दिसत आहेत. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. भाजपचे काही नेते जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवणारी विधाने करत आहेत. अशा भडकवणाऱ्या व्यक्तींवर सर्वप्रथम कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.,’ असे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra : नागपुरात दंगलीनंतर पश्चिम विदर्भात पोलिसांचा हाय अलर्ट जारी
हिंसाचार उफाळला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत, कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे सांगितले आहे. तसेच, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. दंगल करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील जनतेशी अपील करत शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरातील या तणावपूर्ण घटनेवर राजकीय नेत्यांनीही आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे, ‘नागपूर कधीही दंगलीचे केंद्र नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. राज्य सरकार अशा प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके हेही घटनेची माहिती मिळताच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून नागपूरकडे रवाना झाले आहेत.
पोलिसांचा हाय अलर्ट
नागपुरातील या घटनेनंतर राज्यभरातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, खामगाव, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मुंबईतील काही भागांतही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागपुरातील परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यरात्री तातडीची बैठक बोलावली.