महाराष्ट्र

Nagpur : उपराजधानीत आघाडीचे गेले की बारा

Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्याने दिला मोठा राजकीय धक्का

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केले.

नागपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत वर्चस्व गाजवण्यासाठी पक्षांमध्ये हालचाली वेगवान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आता थेट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर हल्ला चढवत 12 नगरसेवकांना आपल्या गोटात खेचले आहे.

नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नगरसेवक भाजपात सामील झाले. हा प्रवेश भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली झाला. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Sanjay Raut : मोदींचे अवतारकार्य संपले, आता निवृत्ती घ्या

काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नागपूर दौरा केला. या नागपूर दौऱ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्थानिक निवडणुकांपूर्वीच भाजपने जोरदार खेळी करत काँग्रेसमध्ये मोठी गळती घडवून आणली आहे. यामुळे नागपूरमध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत होताना दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि घटक पक्षातील 22 सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी याआधीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ही गळती थांबण्याचे नाव घेत नाही. रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी संलग्न नेते आणि कार्यकर्तेही भाजपच्या छत्राखाली दाखल झाले आहेत.

Mohan Bhagwat : संघाच्या तत्त्वज्ञानात भगवान शिवाचा आदर्श

राजकीय चित्र बदलणार

भाजपमध्ये या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीला मोठे नुकसान झाले आहे. भाजपने नागपूर जिल्ह्यात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. या घडामोडी आगामी स्थानिक निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकू शकतात. काँग्रेसमधील नाराजी, भाजपचे वाढते बळ, आणि मोदींच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली ऊर्जा यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा प्रभाव अधिक वाढू शकतो.

आमदार समीर मेघे, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, ग्रामीण अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार राजू पारवे, डॉ. राजीव पोद्दार, अनिल निधान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आता नागपूरच्या राजकीय रणधुमाळीत आणखी काय उलथापालथ होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!