महाराष्ट्र

Vikas Thakre : नागपूर महापालिकेत काँग्रेसची एकल झुंज

Nagpur : उपराजधानीच्या मतदारांचा कल फिरणार दोन पक्षांभोवती

Author

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. मात्र, नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाने विशेष लक्ष वेधले आहे.

नागपूरच्या राजकीय आभाळात सध्या नव्या वाऱ्यांची चाहूल लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असताना, सत्तेच्या समीकरणांची चर्चा उफाळून येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भाजप-काँग्रेस युतीचे संकेत मिळत होते. पण ते केवळ राजकीय पटलावरील धूसर चित्र ठरले. आता, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की, आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आहे.

ठाकरे म्हणाले, नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आम्ही गेली पाच वर्षं सातत्याने तयारी करत आहोत. येथील लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच असते. इतर पक्ष केवळ कागदावर असतात. राजकीय संघर्षात फक्त आकडे आणि दावे महत्त्वाचे नसतात, तर इतिहास, संघटन आणि जनतेशी असलेला संपर्कसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. एनसीपीचे नेते अनिल देशमुख यांनी नागपूर महापालिकेच्या शंभर जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे जाहीर केल्यानंतर, विकास ठाकरे यांनी त्यावर टोला लगावत म्हटलं, मैदान सर्वांसाठी खुलं आहे. त्यांनी 100 नव्हे, तर 151 जागांवर तयारी करावी.

Parinay Fuke : प्रतिसाद न दिल्यानं संतप्त आमदार ‘भेल’ची करणार गिल्ली मिसळ

आघाडीवर आहे लक्ष

ठाकरेंच्या या वक्तव्यातून काँग्रेसचा आत्मविश्वास स्पष्ट दिसतो. ठाकरे म्हणाले, आमच्याकडे 1 हजार पाचशेहून अधिक इच्छुकांनी तिकीटासाठी अर्ज केले आहे. आम्हाला 151 जागांवर उमेदवारी द्यायची आहे. सर्व ठिकाणी काँग्रेसची यंत्रणा सज्ज आहे. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेनंतरही ठाकरे यांनी राजकीय समजूतदारपण दाखवत एक बाब स्पष्ट केली. जर गठबंधनातील पक्षांनी योग्य जागांवर सहमती दर्शवली, तर आम्ही त्यावर नक्की विचार करू. पण काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत तयार आहे. 2019 पासूनच काँग्रेसने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची सातत्याने चालू असलेली आंदोलने, प्रचार मोहिमा आणि संघटनात्मक बैठक यांचाही विशेष उल्लेख केला. लोकसभा असो किंवा विधानसभा आम्ही नेहमीच सक्रिय राहिलो आहोत. त्यामुळे महापालिका निवडणूक आमच्यासाठी एक नैसर्गिक लढाई आहे, असंही ते म्हणाले. एनसीपीबाबत बोलताना ठाकरे यांनी जुना इतिहास आठवायला सांगितला. त्यांनी स्पष्ट केलं की, फक्त दावे करणं पुरेसं नाही, जुना इतिहासही पाहावा लागतो. पूर्वी एनसीपी एक होती, आता दोन गट पडले आहे. या वक्तव्याने त्यांनी एनसीपीच्या अंतर्गत गोंधळावरही निशाणा साधला. एकूणच काँग्रेसने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

Vijay Wadettiwar : भाजपला ठाकरे बंधूंचं एकत्र येणं परवडणार नाही

स्वबळावर लढण्याचा निश्चय, कार्यकर्त्यांची तयारी आणि स्पष्ट राजकीय दिशादर्शक धोरण यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेची निवडणूक म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील एक महत्त्वाची चुरस ठरणार यात शंका नाही.

Parinay Fuke : प्रतिसाद न दिल्यानं संतप्त आमदार ‘भेल’ची करणार गिल्ली मिसळ

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!