महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : स्पीड मेट्रोची, सिक्युरिटी पोलिसांची

Nagpur : बावनकुळे सरांचं गुन्हेगारांसाठी हायटेक प्लॅनिंग

Author

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासोबत कामठी शहरालाही विकासाची नवी संधी मिळतेय. पोलिस ठाण्याच्या जागी अत्याधुनिक स्मार्ट पोलिस मुख्यालय उभारण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शहराचा कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक वाहतूक दोन्ही हायटेक होणार आहेत.

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, या प्रकल्पाला आणखी एक महत्त्वपूर्ण संजीवनी मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला, कामठी शहरातील पोलिस ठाण्याच्या जागी अत्याधुनिक, सर्व सुविधांनी युक्त स्मार्ट पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. महामेट्रोला दिलेल्या जागेच्या बदल्यात आता कामठी शहराला नवे आणि अत्याधुनिक पोलिस मुख्यालय मिळणार आहे.

नागपूर जिल्हा नियोजन समिती भवनात झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महामेट्रो अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, नवीन स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देताना पोलिस ठाण्याचा देखील आधुनिक पुनर्विकास करावा. यामुळे केवळ मेट्रो प्रकल्पालाच चालना मिळणार नाही, तर कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोठे पाऊल उचलले जाणार आहे. या निर्णयामुळे नागपूर ग्रामीण पोलिस दलाला नव्याने कार्यरत राहण्याची संधी मिळेल.

Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’

स्मार्ट पोलिस स्टेशन

नव्या प्रस्तावानुसार केवळ पोलिस ठाण्याचा विकास होणार नसून, त्याच इमारतीत डीसीपी कार्यालय, अत्याधुनिक कंट्रोल रूम, अत्याधुनिक सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असतील. पालकमंत्री बावनकुळे यांनी याबाबत ठाम भूमिका घेत, महामेट्रो अधिकाऱ्यांना नवीन डिझाईन तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रकल्प खर्चाच्या कारणाने थांबता कामा नये. त्यामुळे याचा संपूर्ण खर्च मेट्रो प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात यावा, अन्यथा राज्य सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल.

कामठीकरांसाठी सुवर्णसंधी

महामेट्रो आणि नागपूर ग्रामीण पोलिस विभाग यांच्यातील सहकार्यामुळे कामठीकरांना डबल फायदा मिळणार आहे. एकीकडे शहराला वेगवान आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळेल. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मुख्यालय मिळणार आहे. पोलिसांसाठी स्वतंत्र पार्किंग, नागरिकांसाठी आधुनिक सुविधा आणि डिजिटल तक्रार नोंदणी केंद्र यांचा समावेश या स्मार्ट पोलिस ठाण्यात असणार आहे.

BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात

विकासासाठी मोठे पाऊल

कामठी शहराच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागाचा शहरीकरणाचा वेग वाढत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ मेट्रो प्रकल्पच नाही, तर नागपूर जिल्ह्यातील प्रशासकीय सुविधा अधिक बळकट होण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यात अशा विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!