आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस यंदा नागपूरमध्ये ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा झाला. शहरभर विविध सामाजिक, आरोग्य व शिक्षण उपक्रमांत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस यंदा शहरभर सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी विविध भागात ‘लोकसेवा दिवस’ म्हणून हा दिवस विशेष बनविला. दिवसभरात आरोग्य, शिक्षण आणि जनकल्याण क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. हा उत्सव केवळ आनंदाचा नव्हे, तर समाजसेवेची बांधिलकी स्पष्ट करणारा ठरला.
सकाळपासूनच आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयातून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध उपक्रमांत नागरिकांना थेट सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. यामध्ये बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण, अनाथ आश्रमातील फळवाटप, तसेच शाळांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य संदेश पोहोचविणे यांचा समावेश होता.
Dattatray Bharane : वाशीम-नांदेडच्या शेतकऱ्यांची संकटाची कहाणी
शहरभर समाजोपयोगी उपक्रम
कार्यक्रमाची पहिली भेट श्रद्धानंद अनाथ आश्रमात झाली. जिथे वृद्ध व गरजू मुलांसाठी फळवाटप करण्यात आले. त्यानंतर खामला येथील ज्युपिटर हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जेथे स्थानिक नागरिकांना आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मिळाले. मनीषनगर येथील अमृत लॉनमध्ये शासकीय योजना व लाभांविषयी माहिती देणारे शिबिर पार पडले. ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळाली. रामेश्वरीतील संत कैकाडी महाराज उद्यानातही आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भगवान नगर येथील धनश्री मंगल कार्यालयात आणि बुद्धविहारात भंतेजींना चिवरदान करण्यात आले. या उपक्रमांमुळे नागपूरकरांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक योगदान याबाबत जागरूकता वाढली.
दुपारनंतर आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीचे कार्यक्रम पार पडले. सायंकाळी तकीया येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये सुंदरकांड पठण झाले. तर लुंबिनीनगर येथील बुद्धविहारात नागरिकांना सुरक्षिततेसाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्रिमूर्तीनगरमधील भगवती लॉनवर भव्य सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नरेंद्रनगर चौकात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तर काशीनगर आणि रामेश्वरी येथे पारंपरिक दहीहंडी कार्यक्रमात आमदार संदीप जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला. दिवसभर राबविण्यात आलेले हे कार्यक्रम आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील लोकसेवेची महत्त्वपूर्ण प्रतिमा साकार करणारे ठरले.
Gadchiroli : पावसाच्या निसर्ग क्रांतीत हेलिकॉप्टरने दिले आशेचे पंख
मुख्यमंत्री यांचे सरप्राईज
वाढदिवसाच्या दिवशी आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात सकाळपासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रांग लागली होती. या शुभेच्छांना आणखी खासत्व देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरला आले. त्यांनी प्रत्यक्ष भेटून आमदारांना शुभेच्छा दिल्या. ज्यामुळे हा दिवस कार्यकर्त्यांसाठी आणि आमदारांसाठी प्रेरणादायी ठरला. आमदार संदीप जोशी यांनी या भेटीला सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायक मानून पुढील उपक्रमांत अधिक सक्रिय सहभागाची तयारी दर्शविली. वाढदिवसाच्या दिवशी राबविण्यात आलेले उपक्रम हे केवळ आनंदाचे नव्हे, तर नागपूरमध्ये लोकसेवा व समाजकल्याणासाठी बांधिलकी दाखविणारे ठरले.
