महाराष्ट्र

Nagpur : मोदींच्या व्हिजनला नागपूरचा प्रतिसाद, वन नेशन, वन कार्ड प्रत्यक्षात

One Nation One Card : महापालिकेचा पुढाकार, डिजिटल युगाची नवी दिशा

Author

नागपूरकरांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक स्मार्ट आणि सुलभ बनवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ लाँच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “वन नेशन, वन कार्ड” या उपक्रमाचा भाग असलेले हे कार्ड आता ‘आपली बस’ सेवेमध्ये वापरता येणार आहे.

नागपूर शहरातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि स्वागतार्ह बातमी आहे. आता नागपूरमध्ये प्रवास अधिक सोयीचा, जलद आणि डिजिटल होणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी 15 एप्रिल मंगळवारी नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) चे अधिकृतपणे लोकार्पण केले. हे कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “वन नेशन, वन कार्ड” या दूरदृष्टी असलेल्या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे एकच कार्ड वापरून देशभरातील सार्वजनिक वाहतूक, टोल, पार्किंग व इतर सेवा सुलभरीत्या व कॅशलेस पद्धतीने वापरणे.

नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेसाठी या कार्डचा वापर सुरू करण्यात आला आहे. हे कार्ड चलो अ‍ॅपच्या माध्यमातून लाँच करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना एकत्रित डिजिटल सेवा मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल. आता प्रवाशांना दरवेळी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही, कारण हे कार्ड एका टॅपमध्ये पेमेंट करण्याची सुविधा देते.

सहज आणि सरळ उपयोग

हे कार्ड नागपूरमधील वाडी, हिंगणा, पटवर्धन मैदान आणि नाका क्रमांक १३ येथील बस डेपोमध्ये उपलब्ध आहे. तसेच, प्रवासी हे कार्ड बस पास केंद्रांवरून किंवा थेट बस कंडक्टरकडूनही प्राप्त करू शकतात. यामध्ये विशेषतः हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे कार्ड ऑनलाईन चलो अ‍ॅपद्वारे सहज रिचार्ज करता येते, त्यामुळे पुन्हा रिचार्जसाठी केंद्रांवर जाण्याची गरज भासत नाही.

Mahayuti : नागपूरमध्येही आता MARVEL दिसणार

कार्यक्रमात बोलताना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आता ‘आपली बस’ मध्ये प्रवासासाठी हेच एकमेव कार्ड वापरण्यात येणार आहे. याआधी महानगरपालिकेने जारी केलेल्या कार्डांची सुविधा सुरू राहील. परंतु त्यांच्या वैधतेची मुदत संपल्यानंतर नव्या एनसीएमसी कार्डचा वापर अनिवार्य होईल. त्यांनी असेही सांगितले की, नागपूर महानगरपालिका ही नागपूरकरांसाठी डिजिटल आणि स्मार्ट प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे.

अधिक सुलभ 

सध्या हे कार्ड ‘आपली बस’ सेवेमध्ये वापरता येईल, मात्र लवकरच नागपूर मेट्रो (महा मेट्रो) मध्येही याचा वापर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर नागपूर मेट्रोतूनही एनसीएमसी कार्डद्वारे प्रवास करता येईल. एक कार्ड, अनेक सुविधा: बस, टोल, पार्किंग, मेट्रो (लवकरच) यांसारख्या सेवांसाठी एकच कार्ड. सुटे पैसे, तिकीटाच्या रांगा यापासून सुटका होईल. चलो अ‍ॅपवरून कार्ड सहज रिचार्ज करता येईल. तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि वापरायला सोपे.

नागपूर महानगरपालिकेचा हा पुढाकार शहराच्या स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ‘नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’मुळे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक, सुलभ आणि आधुनिक होणार आहे. आता नागपूरकरांसाठी स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट प्रवासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!