प्रशासन

Nagpur : आरबीआयच्या आक्षेपामुळे महापालिका निवृत्ती वेतन संकटात

Financial Impact : पेन्शन बंदीचा निर्णय एक जुलैपासून लागू

Author

मंगळवारपासून जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे. 1 जुलै 2025 पासून देशभर अनेक महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम नागपूर महानगरपालिकेवरही दिसून येत आहे.

जून महिना नुकताच संपलेला आहे. मात्र जुलैच्या सुरुवातीस नागरिकांसाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम आणि धोरणांमध्ये बदल होत असतो, पण या वेळी नागपूर महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हा बदल जास्तच चटका जाणवणार आहे. महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने थेट निर्णय घेतला आहे की 1 जुलै 2025 पासून 129 निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद करण्यात येईल. या निर्णयामुळे वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांपुढे मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) स्पष्ट आक्षेप कारणीभूत ठरला आहे.

आरबीआयने बँकेच्या निवृत्ती वेतन निधीबाबत लेखापरीक्षण दरम्यान गंभीर शंका व्यक्त केल्या. आरबीआयच्या नियमानुसार निवृत्ती वेतनासाठी आवश्यक असलेली तरतूद सध्याच्या आर्थिक परिस्थितीत शक्य नाही, असा निर्वाळा बँकेच्या संचालक मंडळाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर 13 मे आणि 1 जून 2025 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवृत्ती वेतन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. जून महिन्यात बँकेने सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवून याची माहिती दिली. नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड ही संस्था 21 जुलै 1934 रोजी स्थापन झाली. सुरुवातीला ही पतसंस्था म्हणून कार्यरत होती आणि नंतर 1जून 1995 पासून बँकेत रूपांतरित झाली.

Shalartha ID Scam : शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा भस्मासूर

कायदेशीर मार्गाचा विचार

बँकेचे मुख्यालय कोठी रोड, महाल येथे असून नंदनवन, पाचपावली आणि सिव्हिल लाईन्स या ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत. सध्या बँकेचे एकूण 4 हजार 841 सदस्य असून सर्व सदस्य हे नागपूर महानगरपालिकेचे कार्यरत कर्मचारी आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत बँकेचे एकूण भागभांडवल 12 कोटी 40 लाख 82 हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या आर्थिक सामर्थ्याची बँक असतानाही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा मार्गी लावण्यात अपयश आले आहे. महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या दैनंदिन कामकाजात कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे, कर्ज प्रक्रिया करणे, पैसे हस्तांतरण, खाते उघडणे आणि इतर बँकिंग सेवा हे त्यांचे मुख्य कार्य आहे.

बँकेतील कर्मचाऱ्यांना बँकेच्या हितासाठी पारदर्शकतेने आणि नियमांनुसार काम करण्याची जबाबदारी आहे. बँकेच्या नियमांची अंमलबजावणी, आर्थिक सुरक्षितता आणि ग्राहकांचे समाधान राखण्याचा मोठा भार कर्मचाऱ्यांवर असतो. मात्र, सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांशी संबंधित घेतलेला निर्णय त्यांच्या भविष्यावर गडद सावली टाकतो आहे. महापालिकेच्या 129 निवृत्त कर्मचाऱ्यांचे आयुष्य पेन्शनवर अवलंबून आहे. बँकेच्या या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धक्का बसला आहे. काहींनी आधीच याविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची तयारी सुरु केली आहे. आता हा निर्णय मागे घेण्याचा दबाव बँकेवर येतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बँकेचे हे पाऊल केवळ नागपूरपुरते मर्यादित नाही तर राज्यातील इतर सहकारी संस्थांसाठीही इशारा देणारे ठरू शकते.

Vikas Thakre : नागपूरच्या झोपडपट्टी पुनर्विकासाला आमदाराची मिळाली साथ

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!