
नागपूर महानगरपालिकेच्या 2025-26 अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात हरित इमारतींना खास सवलत आहे.
प्रदूषण आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी नागपूर महानगरपालिका नव्या ध्येयाने पुढे आली आहे. भारतीय हरित भवन परिषद (IGBC) प्रमाणित इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी आता महानगरपालिकेने मालमत्ता करात 20 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी करत पर्यावरणपूरक बांधकामांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. नागपूर महानगरपालिका शहरातील पर्यावरणीय आरोग्य सुधारण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

शहरातील प्रदूषण आणि तापमान नियंत्रणासाठी हरित इमारतींना चालना देणे हा यापुढे महापालिकेचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. या नवीन निर्णयामुळे पर्यावरणास अनुरूप बांधकामांना अधिक पसंती मिळणार असून, विजेचा वापर कमी करणार्या आणि पर्यावरणपूरक साहित्यांचा उपयोग करणाऱ्या इमारतींना मोठा फायदा होणार आहे. महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्ष 2025-25 अर्थसंकल्प सादर करताना महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या सूटविषयक आदेशाची माहिती दिली आहे.
Supreme Court Of India : न्यायमंदिरात पहिल्या स्त्रीचा दीपपर्व
बांधकामात हरित क्रांती
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४०(ब) अंतर्गत घेतलेल्या या निर्णयानुसार, भारतीय हरित भवन परिषदेने प्रमाणित केलेल्या इमारतींना मालमत्ता करात 20 टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे. या सूटमुळे पर्यावरणपूरक बांधकामांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नागपूरमध्ये हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. या सवलतीचा लाभ ज्या इमारतींना मिळणार आहे, त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन, जैविक खतनिर्मिती, सौरऊर्जेचा वापर आणि पाण्याचे पुनःप्रक्रिया यांसारख्या तंत्रांचा वापर केलेला असणे आवश्यक आहे.
28 मार्च 2025 रोजी मंजूर झालेल्या ठराव क्रमांक 141 नुसार ही सवलत दिली जाणार असून, यामुळे बांधकाम व्यवसायातही पर्यावरणपूरक नवकल्पना वाढण्याची अपेक्षा आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या मुख्यालय किंवा त्यांच्या संबंधित विभागीय झोन कार्यालयातील कर विभागात अर्ज करणे अनिवार्य आहे. यासोबतच, अर्जदारांनी भारतीय हरित भवन परिषदेने जारी केलेले हरित इमारत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या प्रोत्साहनामुळे नागपूरमध्ये पर्यावरणपूरक बांधकामांचा वेग वाढेल वाढणार आहे.
सौरऊर्जेचा वाढता वापर
नागरिकांमध्ये सौरऊर्जा, पावसाचे पाणी संकलन, सांडपाण्याचे पुनःप्रक्रिया व जैविक खतनिर्मिती यांसारख्या गोष्टींचा जास्त वापर होईल. या निर्णयामुळे नागपूर शहराला एक हरित व पर्यावरणास स्नेही शहर बनवण्याच्या दिशेने मोठा पाऊल उचलण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम पर्यावरणपूरक व टिकाऊ शहरनिर्मितीसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास आहे. आपले शहर प्रदूषणमुक्त आणि थंड ठेवण्यासाठी नागरिकांनीही या योजनांचा पूर्णपणे लाभ घेणे गरजेचे आहे.