प्रशासन

Nagpur : बैलेट पेपरची मागणी गगनाला भिडली

Municipal Election : नागपूरमध्ये राजकीय शक्तींचा एकत्रित झंझावात

Author

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोमाने पुढे आली आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या मागणीसाठी समिती स्थापन केली आहे.

आगामी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होताच, बैलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. नागपूर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत या मागणीसाठी संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडे बैलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची अधिकृत मागणी करण्यात येणार आहे. या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांनी माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जगातील अनेक विकसित देशांमध्ये निवडणुका आजही पारंपरिक बैलेट पेपरद्वारे घेतल्या जातात. यामुळेच नागपूर शहरातील विविध विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन बैलेट पेपरच्या मागणीसाठी संघटीत झाले आहेत. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होण्यासाठीच ही भूमिका घेण्यात आली आहे.

Sulbha Khodke : पर्यटन विकासाचा आराखडा घेऊन आमदार पोहोचल्या विधिमंडळात

लोकशाहीच्या मजबुतीसाठी मागणी

कुणाल राऊत यांनी यावेळी सांगितले की, मागील काही निवडणुकींमध्ये इव्हीएम मशीनवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. विशेषतः महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 मधील निवडणुकीत इव्हीएम संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची जपणूक करण्यासाठी बैलेट पेपरचा पर्याय अधिक योग्य असल्याचे एकत्रित राजकीय गटाचे म्हणणे आहे. त्यामुळेच शहरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन स्वतंत्र समिती स्थापन केली असून या समितीमार्फत ही मागणी अधिक जोमाने पुढे नेण्यात येणार आहे.

या समितीत काँग्रेससह बहुजन समाज पक्ष आणि इतर अनेक एकसंध विचारधारेचे पक्ष सहभागी झाले आहेत. येत्या 18 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाशी बैठक घेऊन अधिकृतरीत्या बैलेट पेपरच्या मागणीवर चर्चा होणार आहे. या मागणीला प्रतिसाद मिळावा यासाठी समिती विविध पातळ्यांवर जनजागृती मोहीम राबविणार आहे.

Ravindra Shinde : भाऊभाऊंची मिठी गाजली; पण जिल्हाध्यक्ष म्हणाले, या ड्राम्यात ‘मी नाही’

जनजागृतीसाठी विशेष मोहीम

बैलेट पेपरच्या मागणीसाठी समिती विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. त्यामध्ये जनजागृती अभियान, स्वाक्षरी मोहिम आणि मतदान जागृती मोहीम यांचा समावेश असणार आहे. नागरिकांना निवडणुकीतील पारदर्शकतेचे महत्व पटवून देणे आणि बैलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याबाबत लोकमत तयार करणे हे या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट असेल. या संपूर्ण अभियानाला शहरात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय पक्षांनी पारदर्शक निवडणुकीसाठी एकत्र येणे ही नागपूरच्या राजकारणात लक्षणीय घडामोड मानली जात आहे. आगामी निवडणुकीत बैलेट पेपरचा मुद्दा अधिक तीव्रतेने चर्चेत राहणार असून लोकशाही प्रक्रियेत विश्वास निर्माण करण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार आहे. नागपूरमध्ये बैलेट पेपरच्या मागणीसह निवडणुकीच्या रंगतदार लढाईला आता सुरुवात झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!