प्रशासन

Nagpur Police : ‘ऑपरेशन शक्ती’ने उद्ध्वस्त केला देहव्यवसायाचा गड

Operation Shakti : गुन्हेगारीच्या लाटांना पोलिसांचा अभेद्य किनारा

Post View : 28

Author

नागपूर पोलीस  सातत्याने शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचे अनेक उदाहरण नागपूरकरांनी अनुभवले आहे.

संत्रा नगरी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर म्हणूनही ओळखले जाते. यामुळे या शहराला विशेष प्राधान्य मिळालेले आहे, पण त्याचबरोबर स्मार्ट सिटी म्हणूनही ते प्रगतीशील दिसते. मात्र, एकेकाळी या शहराला ‘क्राईम सिटी’चा दुर्दैवी टॅग लागला होता. रस्त्यारस्त्यावर गुन्हेगारीचे सावट पसरलेले होते आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. हा काळा डाग पुसण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक क्रांतिकारी मोहीम हाती घेतली. ती म्हणजे ‘ऑपरेशन शक्ती’. या मोहिमेद्वारे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यात येत आहे. शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची मेहनत दिसून येत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक निष्पाप जीव वाचवण्यात यश आले आहे.

नागपूरच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत अवैध देहव्यवसायाच्या टोळीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईने शहरातील गुप्त आणि ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भंडारा रोडवरील शेरे पंजाब रेस्टॉरंट अँड लॉजिंग येथे ही कारवाई पार पडली. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 : 30 ते रात्री 9 पर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आणि पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत पोलिस हवालदार रुपेश नानवटकर यांनी फिर्याद दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धाडसी कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली. पहिली आरोपी समीक्षा संजय शेंडे (वय 38), वायुसेना नगरातील रहिवासी. दुसरा मनजित अजितसिंग भाटिया (वय 60), वर्धमान नगरातील.

Reservation Impact : बुलढाणा नगर परिषदेवर येणार महिला राज

ऑनलाइन रॅकेटचा पर्दाफाश

तिसरा सुरेदरसिंग जसवंतसिंग भाटिया (वय 72), शेरे पंजाब हॉटेलचा मालक आणि मूळचा पंजाबचा. चौथा शैलेंद्र गोविंदसिंग शेंगर (वय 37), पारडीतील रहिवासी जो मूळचा मध्यप्रदेशचा आहे. हे आरोपी पीडित महिलांना आर्थिक प्रलोभने देऊन देहव्यापारात ढकलत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून चार मोबाइल फोन ज्याची किंमत 40 हजार रुपये आहे. 2 हजार 50 रुपये रोख, 22 हजार 515 रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाने एक महत्त्वाची गोष्ट उघड झाली आहे. हे रॅकेट आता पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सद्वारे ‘हाय प्रोफाइल’ पार्टीजच्या नावाखाली चालवले जात आहे. मोठमोठ्या फार्महाऊस किंवा हॉटेल रूम्समध्ये ऑनलाइन पेमेंटद्वारे मुली बोलावल्या जातात आणि त्यांचा सौदा हजारों रुपयांत होतो.

नागपूर पोलिसांनी याविरुद्ध व्यापक मोहीम उघडली असून, शहरातील हॉटेल्स, लॉजिंग्स आणि फार्महाऊस मालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या गैरप्रकारांपासून दूर राहा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नागपूर क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. गुप्त सापळे रचून, यशस्वी अंमलबजावणी करून आणि तडफदार पद्धतीने महिलांना मुक्त करण्याचे कार्य केले आहे. ‘ऑपरेशन शक्ती’ आता फक्त वेश्याव्यवसायाविरुद्धच नव्हे, तर त्यामागील संपूर्ण सायबर आणि लॉजिस्टिक नेटवर्क उघड करण्याचा निर्धार करत आहे. या मोहिमेद्वारे शहरातील गुन्हेगारीला संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांची जिद्द दिसून येत आहे. येत्या काळात आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता आहे.

Gadchiroli : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात ओबीसींचा डंका

नागपूर शहराची ओळख आता बदलत आहे. एकेकाळी क्राईम सिटी म्हणून बदनाम झालेले हे शहर आता स्मार्ट आणि सुरक्षित शहर म्हणून उदयास येत आहे. पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात सुरू असलेली ही मोहीम केवळ गुन्हेगारी संपवण्यापुरती मर्यादित नाही, तर समाजातील असमानता आणि शोषणाविरुद्धची लढाई आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!