प्रशासन

Nagpur : वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सिंगल स्टाईल फ्लॅग मार्च

Ravinder Singal : रामनवमी मिरवणुकीसाठी नागपूर पोलीस सज्ज

Post View : 65

Author

वक्फ विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभरात तणाव निर्माण झाला. याची दखल घेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरात भव्य फ्लॅग मार्च काढला.

वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर संपूर्ण देशभरात राजकारण तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलनं, निदर्शने आणि घोषणाबाजी होत आहे. मुस्लिम नेत्यांनी शाहीनबागच्या धर्तीवर मोठ्या आंदोलनांची हाक दिली आहे, त्यामुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वतः चार मार्च रोजी पाच हजार पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरभर फ्लॅग मार्च काढत शक्तिप्रदर्शन केले. नागपूर शहरही या घडामोडीमुळे सतर्क झाले आहे.

शहरात नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून कंबर कसली आहे. मेयो रुग्णालय चौकातून सुरू झालेल्या या भव्य मार्चने संपूर्ण नागपूरच्या संवेदनशील भागांचा आढावा घेतला आणि पोलिसांच्या तयारीचा संदेश दिला. अग्रसेन चौक, चितारओळी चौक, केळीबाग रोड, बडकस चौक, गांधी गेट, टिळक पुतळा चौक, गांधी सागर चौक, बर्डी बाजार हा मिरवणुकीचा मार्ग होता, जो शेवटी पोलीस मुख्यालयात संपला.

Amravati : कचरा माफिया संपवण्यासाठी कठोर नियम लागू

प्रशासनाची पूर्वतयारी

वक्फ विधेयकावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ठिकाणी आंदोलनं हिंसक वळण घेत असल्याने पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली आहे. नुकताच नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणखी सावध झाले आहे. सहा मार्चरोजी होणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. फ्लॅग मार्चचा उद्देश स्पष्ट होता, नागपूर पोलिस शहरात शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहेत.

कुठल्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही. मोठ्या संख्येने पोलीस दल रस्त्यावर उतरल्याने नागरिकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर हिंसाचारामागे सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवा आणि चुकीच्या माहितीस जबाबदार धरण्यात येत आहे. फेक न्यूजमुळे परिस्थिती अधिक बिघडली आणि काही लोकांनी या गोंधळाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे रवींद्र सिंगल यांच्या आदेशाने सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.

Gondia : सुनील मेंढे यांचा द्रष्टेपणा, गोंदियाच्या रेल्वे नेटवर्कला मोठी चालना 

सुरक्षेचा संदेश

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीची किंवा भडकाऊ माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी यासाठी एक ॲडव्हायजरी देखील जारी केली आहे, ज्यामध्ये शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क आहेत. पोलिसांचा हा शक्तीप्रदर्शन फ्लॅग मार्च नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देणारा ठरला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!