प्रशासन

UPSC : स्वप्न होतं मोठं, जिद्द होती अपार; नागपूरच्या राहुलने केली कमाल

Rahul Atram : आयपीएस झाल्यानंतरही थांबला नाही

Author

नागपूरच्या राहुल अत्राम यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत यश मिळवून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

स्वप्न जर खरे करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही अडथळ्यांची शर्यत लहान वाटते. हेच सिद्ध केलंय नागपूरच्या राहुलने रमेश आत्राम याने. 2023 मध्ये UPSC मध्ये यश मिळवून आयपीएस अधिकारी बनलेला राहुल, दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वी झाला होता. पण त्याला थांबायचं नव्हतं. कारण ध्येय होतं आयएसएस अधिकारी बनण्याचं. आता 2025 मध्ये तो दिवस उजाडला आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात 481 क्रमांक मिळवत राहूलने आयएएसचं स्वप्न साकारलं आहे. हे यश त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं केवळ स्वप्न नव्हतं, तर तो एक संकल्प होता. जो त्याने मेहनतीने पूर्ण केला.

2023 मध्ये राहुलने यूपीएससीमध्ये 663 रँक मिळवत देशभरातून निवड झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं होत. सध्या तो परिक्षाधीन आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पण त्याचं मन सेवेचं सर्वोच्च शिखर गाठण्याच्या दिशेने वळलं होतं. आयपीएस झाल्यावर समाधान मिळालं नाही. आयएएसचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं. त्यासाठी पुन्हा अभ्यास सुरू केला, असं राहुल म्हणतो. शेवटी, सातत्य आणि ध्येयाशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याने यूपीएससी 2025 मध्ये 481 रँक मिळवून आयएसएस पदाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या

समाजकल्याणाचा वारसा

राहुलने पदवीचे शिक्षण पूर्ण करतानाच यूपीएससीसाठी तयारी सुरू केली होती. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी तो दिल्लीला गेलाच नाही. केवळ मुलाखतीसाठीच दिल्ली गाठायचं हे त्याचं ठरलेलं होतं. आणि त्याने ते ही जपून पाळलं. तयारीदरम्यान वेळेचं योग्य नियोजन, नियमित अभ्यास, आणि आत्मविश्वास यावर भर दिला. सातत्य आणि शिस्त यामुळेच यश मिळतं, असं तो आवर्जून सांगतो. राहुलचे वडील रमेश आत्राम समाजकल्याण विभागात अधिकारी आहेत. त्यामुळेच लहानपणापासूनच सामाजिक प्रश्न, विशेषतः दुर्लक्षित वर्गाचे प्रश्न, त्याने जवळून पाहिले.

राहुलचे मूळ गाव गडचिरोली जिल्ह्यात असल्यामुळे तिथल्या समस्यांचाही अनुभव त्याला आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम करण्याची संधी आयएएस अधिकारी म्हणून मिळावी आणि शेवटच्या घटकासाठी काही करता यावं, यासाठीच ही वाट निवडली, असं राहुल सांगतो. आज राहुल आत्रामच्या या यशाचं कौतुक संपूर्ण विदर्भातून होत आहे. युवांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या राहुलच्या या प्रेरणादायी प्रवासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते स्वप्न मोठं असावं, आणि प्रयत्न त्याहून मोठे.

Anil Deshmukh : धोक्याच्या छायेत धीराचा हात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!