नागपूरमध्ये ‘रिपब्लिकन फेडरेशन’ची स्थापना करून आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या संघटनेत युवकांचा सहभाग आणि बाबासाहेबांच्या विचारांवरील प्रामाणिक टिकाव केंद्रस्थानी ठेवला आहे.
नागपूरच्या भूमीवर, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी क्रांतीचा बीज रोवला गेला. तिथे आता एक नवे संकल्पित युग उगवत आहे. अनेक वर्षांत आंबेडकरी चळवळ दिशाहीन झाली आहे. तिच्या मूळ आदर्शांना धूसरले आहे. राजकीय स्पर्धेत बाबासाहेबांच्या नावाचा फक्त लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ज्यामुळे समाजातील प्रबोधन आणि वैचारिक जागृती कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चळवळीची नव्याने उभारणी करण्यासाठी एक ठोस पाऊल उचलले गेले आहे. जे तिच्या आत्म्याला नवसंजीवनी देणारे ठरेल.
या प्रयत्नातून निर्माण झालेल्या संघटनेने मूळ उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून पुढील वाटचाल ठरवली आहे. मुख्यसंयोजक मिलिंद पखाले, सहसंयोजक छाया खोब्रागडे, नरेश वाहणे आणि कोषाध्यक्ष डॉ. सुरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वाखाली, चळवळीच्या संकल्पना आणि कार्यक्रमांची रूपरेषा आखली गेली आहे. अप्रामाणिक राजकारण आणि आर्थिक प्रभावात अडकलेल्या चळवळीला नवचैतन्य देण्याचा हा ध्येयपूर्ण प्रयत्न आहे. ज्यामुळे आंबेडकरी समाजात संघटनेची नवीन लहर उसळेल.
Cabinet Decision : अकोल्यापासून मुंबईपर्यंत समृद्धीचा महामार्ग
निकोप राजकारणाची पायाभरणी
आगामी महापालिका निवडणुकीत चळवळ शिक्षण, आरोग्य सेवा, रस्त्यांची सुधारणा आणि रोजगार यांसारख्या सामाजिक मुद्द्यांना प्राधान्य देईल. महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. त्यापैकी बहुतांश दोन वर्षांत नव्याने सुरू करण्याचे ठोस उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून चळवळीची राजकीय संस्कृती मजबूत होईल. समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास गती मिळेल. रिपब्लिकन ही ओळख कधीकाळी आंबेडकरी समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होती. मात्र आता ती संकटात सापडली आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या चळवळीची ओळख धूसर होत आहे. समाजाच्या मागण्या व भावनांना न्याय मिळत नाही. स्वतंत्र विचार, संघटित कृती आणि सामाजिक परिवर्तन यांचा आत्मा पुन्हा जागवण्यासाठी हा प्रयत्न आहे. ज्यामुळे चळवळीला नवे वैभव प्राप्त होईल.
Akola Police : कायद्याच्या कात्रीने गुन्हेगारीची झुडपी छाटली
युवकांच्या सहभागाने चळवळीला नवे रंग भरले जातील. नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या जेन झीला चळवळीत सामावून घेतले जाईल. विविध उपक्रमांद्वारे युवकांना बाबासाहेबांच्या विचारांशी जोडले जाईल. नवीन नेतृत्वाची निर्मिती होईल. हा प्रयत्न चळवळीला प्रामाणिकता आणि ऊर्जा देणारा ठरेल. विविध उपक्रम, संघटना आणि जनजागृती मोहिमांद्वारे आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण होत आहे. फेडरेशनचा आधार वाढत आहे. लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. प्रबोधन, संघटन आणि वैचारिक जागृती यांना प्राधान्य देऊन, चळवळीचे मूळ ध्येय साकार होईल. हा एक व्यापक प्रयत्न आहे. जो आंबेडकरी वारसा टिकवून समाजाला नव्या दिशेने नेतो.