
नागपूर ग्रामीण भागात आता सुरक्षेची ताकद वाढणार आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने सहा गावांमध्ये नवी पोलीस ठाण्यांची उभारणी होणार आहे.
नागपूर ग्रामीण परिसरात सुरक्षा यंत्रणेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सक्रिय पुढाकारातून वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या सहा गावांमध्ये नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या सुरक्षित महाराष्ट्र संकल्पनेला हा निर्णय बळ देणारा ठरतो आहे.

मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पास तातडीने गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाला आवश्यक सहकार्य देण्याची हमीही दिली आहे.
ग्रामीण सुरक्षेला नवा चेहरा
वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा या गावांमध्ये नव्याने उभारल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्वरित मदत मिळणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक आणि सामाजिक बदल लक्षात घेता, या भागांना स्वतंत्र पोलीस ठाण्यांची गरज होती. ही गरज ओळखून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेतृत्वात या प्रस्तावाला मूर्त स्वरूप दिले.
नव्या पोलीस ठाण्यांमध्ये आधुनिक सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, जलद प्रतिसाद पथक आणि नागरिकांशी सुसंवादासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले जाणार आहेत. याद्वारे गावकऱ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे.
प्रशासनिक समन्वयातून कृती
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धोरणात्मक नेतृत्वाचा परिणाम म्हणजेच ही निर्णायक पावले. त्यांनी पोलीस विभागासोबत समन्वय साधून केवळ प्रस्ताव मांडला नाही, तर त्यास तातडीने अंमलबजावणीसाठी यंत्रणेला सक्रिय केले. त्यांच्या नेतृत्वाची ही कार्यशैली नागपूर ग्रामीण परिसरासाठी आदर्श ठरत आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे या प्रकल्पास गती मिळेल आणि नागपूर ग्रामीण परिसराच्या कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होईल. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था मजबूत होईल, तर दुसरीकडे गावांमध्ये विकासाला गती मिळेल.