
उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत मुख्य आरोपी फहीम खानवर कठोर केली. मात्र आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
17 मार्च रोजी उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटांत उसळलेल्या दगडफेकीच्या राड्यानंतर निर्माण झालेल्या भीषण हिंसाचारानं संपूर्ण शहर हादरून गेले होते. शहरात एकच खळबळ उडाली, वातावरणात भीतीचं गडद सावट पसरले होते. या घटनेच्या पार्श्वभू. मीवर प्रशासनाने झपाट्याने हालचाली सुरू करत कारवाईचा धडाका लावला होता. या दंगलीचा मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि लगेचच त्याला अटक करण्यात आली. पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला असून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात आले.
न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने आणि तपासावर परिणाम होऊ नये म्हणून फहीम खानचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.17 मार्च रोजी महाल परिसरात सुरू झालेल्या या हिंसक घटनेत अनेक दुकाने, वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. 18 मार्चला फहीम खानला अटक करताच त्याच्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तो नागपूर कारागृहात बंदिस्त असून त्याच्या विरोधात पोलिसांचा तपासही वेग घेत आहे.

Akola Shiv Sena : शौचालयाचं गटरभर भविष्य, अकोल्याचा विकास फ्लश
हॉटेलमधून संशय वाढला
यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. फहीम खानने केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून फहीमसाठी आता अडचणी अधिकच वाढल्या आहे. नागपूरच्या वातावरणात अजून एक गाजलेली कारवाई समोर आली आहे. कथित अर्बन नक्षलवादी रेजाझ सिद्दीकीची मैत्रीण, जी सिम्बायोसीस विद्यापीठात शिक्षण घेत होती, तिला विद्यापीठ प्रशासनाने थेट सहा महिन्यांसाठी शिक्षणापासून निलंबित केलं आहे. विद्यापीठाच्या शिस्तभंग समितीनं तिच्यावर दोषारोप ठेवत ही कारवाई केली. 10 मे रोजी निलंबनाचा निर्णय घेण्यात आला होता, जो आता न्यायालयात आव्हान दिला गेला आहे.
8 मे रोजी ती तरुणी रेजाझसोबत नागपूरच्या एका हॉटेलमध्ये असल्याचं समोर आलं होतं. रेजाझने ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे आणि भारतीय सैन्यावर टीका केल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली होती. तपास यंत्रणांनी रेजाझला अटक केली, आणि चौकशीदरम्यान ही तरुणीही पोलिसांच्या रडारवर आली.तपासात असंही समोर आलं की, ही तरुणी नागपूरच्या नामांकित विधी महाविद्यालयात एलएलबीच्या अंतिम सत्रात शिकत आहे. ती बिहारमधील आहे. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं असलं तरी, अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, तिच्यावर नजर ठेवली जात असल्याची माहिती आहे.