देश

National Security : सुनीता जमगडेचा पाकप्रवास एनआयएच्या चौकटीत

Sunita Jamgade : सीमेपलीकडील भेट पडली महागात

Author

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सुनीता जमगडे यांनी काश्मीरमार्गे सीमा ओलांडून थेट पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या भारतात परत आल्यावर आता या प्रकरणावर नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात धक्का बसला होता. या घटनेनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले होते. अशा तणावपूर्ण परिस्थितीत महाराष्ट्रातील नागपुरची 43 वर्षीय सुनीता जमगडे या महिलेंचा पाकिस्तानात प्रवेश केल्याची बातमी प्रचंडच खळबळजनक ठरली आहे. सुनीता एलओसी ओलांडून थेट पाकिस्तानात पोहोचली असून तिला लवकरच भारतात परत आणण्यात आले आहे. सध्या तिच्या विरोधात तपास सुरू आहे.

सुनीता जमगडेने पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न दोन वेळा अटारी बॉर्डरवरून केला, मात्र दोन्ही वेळा अपयश आल्यानंतर तिने एलओसी मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तिला एका पाकिस्तानी ख्रिश्चन धर्मगुरूने एलओसी मार्गाने पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला, अशी आश्चर्यकारक माहिती तिने दिली आहे. सुनीता जमगडे हिला काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली होती. सुनीता तिच्या 13 वर्षीय मुलाला एका हॉटेलमध्ये सोडून काश्मीरमधून भारताची नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली होती.

Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली

वारंवार जबाब बदल

घटना दोन तासांच्या आत घडली असून, कोणत्या ना कोणत्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सुनीताला कोणत्या मार्गांनी मदत मिळाली, ती पाकिस्तानात कोणाला भेटली, आणि तिने भारताबद्दल काही संवेदनशील माहिती दिली आहे का, याची चौकशी सध्या एनआयए आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांद्वारे केली जात आहे. सुनीता अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत होती. परंतु तिची चौकशी करताना पोलिसांना तिच्याकडून पूर्ण सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आले आहे. तिने वारंवार आपले जबाब बदलले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत असताना सुनीता जमगडेने 14 मे रोजी कारगिल परिसरातून नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. तिचा हा धक्कादायक प्रवास तब्बल नऊ दिवस गुप्तच राहिला. अखेर 23 मे रोजी पाकिस्तानी रेंजर्सने तिला भारताकडे सोपवले. त्या दरम्यान सुनीता सोशल मीडियावरून पाकिस्तानातील काही लोकांशी संपर्कात होती. या लोकांमध्ये पाकिस्तानी नागरिक किंवा ISI एजंट असू शकतात, अशी शक्यता असून या बाबतीतही चौकशी सुरू आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी सुनीता जमगडे विरोधात अधिकृत गुप्तहेर कायद्यांतर्गत (Official Secrets Act) झिरो एफआयआर दाखल केला होता.

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या वेदनांवर शासनाची मलमपट्टी 

सुरक्षा यंत्रणा सतर्क

प्रकरण नंतर नागपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला. नागपूर पोलिसांनी तिला अटक करून सखोल चौकशी सुरू केली आहे. सुनीता जमगडेच्या या धक्कादायक कारवायामुळे नागपूर पोलिस तसेच केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले गेले असून तो पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर नागपूरला परत आणण्यात आला आहे. मात्र सुनीता पाकिस्तानात कोणाला भेटायला गेली होती, यावर ती अद्याप स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तिच्या वागणुकीमुळे सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!