
राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय आयटीआयची संख्या 419 आहे. त्यापैकी अनेक संस्थांच्या नावात बदल करण्यात आला आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयानं राज्यातील 132 आयटीआयच्या नावामध्ये बदल केला आहे. संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महायुती सरकारनं पहिल्या टर्ममध्ये हा निर्णय घेतला होता. नाव बदलाबाबतचा हा निर्णय आता लागू करण्यात आला आहे. राज्यात 419 शासकीय आयटीआय आहेत. खासगी आयटीआयची संख्या 585 आहे. त्यातील अनेक संस्थांच्या नावांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत या सर्व संस्थांना केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नावानं ओळखलं जात होतं. आयटीआयच्या नावात बदलांसाठी तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला होता.
नव्या निर्णयानुसार अकोल्याच्या आयटीआयला सम्राट चंद्रगुप्त मौर्य असं नाव देण्यात आलं आहे. अकोटची आयटीआय विक्रम साराभाई नावानं ओळखली जाईल. बाळापूरच्या आयटीआयला आर्यभट्ट यांचं नाव मिळालं आहे. बार्शीटाकळीच्या संस्थेला रामकृष्ण परमहंस यांचं नाव देण्यात आलं आहे. मूर्तिजापूरची आयटीआय डॉ. सतीश धवन यांच्या नवानं ओळखली जाईल. पातूरच्या आयटीआयला राजा रवी वर्मा यांचं नाव असेल. चांदूर रेल्वेच्या संस्थेला डॉ. सी. व्ही. रमण यांचं नाव मिळालं आहे. गडचिरोलीतील देसाईगंजची आयटीआय इंदुताई नाकाडे नावानं ओळखली जाईल.

नव्या नावाची यादी मोठी
धानोराची आयटीआय टिपागड गुरूबाबा या नावानं यापुढं ओळखली जाईल. एटापल्ली आयटीआयचं नवं नाव राजाराम जम्बोजवार असं असेल. कोरचीच्या संस्थेला जगदेवराव उराव यांचं नाव देण्यात आलं आहे. कुरखेडा आयटीआय आता वीर नारायणसिंह उईके नावानं ओळखली जाईल. आलापल्लीच्या आयटीआयचं नवीन नाव राजे विश्वेशराव आत्राम असेल. चामोर्शीतील संस्थेला विठोबाजी लठारे यांचं नाव मिळालं आहे. गोंदियातील अनेक आयटीआयचं नावही बदलण्यात आलं आहे. अर्जुनी मोरगावची आयटीआय आता क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांच्या नावानं असेल. आमगावची संस्था डॉ. मनमोहन सोनी नाव धारण करेल.
सडक अर्जुनी येथील शासकीय आयटीआयचं नाव रंभाजी राव बापू दीक्षित असं करण्यात आलं आहे. तिरोड्यातील नाव बदलून चुडामन बुवा डकराम करण्यात आलं आहे. गोंदिया आयटीआय आता महर्षी अरविंद यांच्या नावावर असेल. गोरेगावच्या संस्थेचं नाव महर्षी विक्रमादित्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखली जाईल. देवरीतील पालांदूरची आयटीआयचं नाव महर्षी दधीची असेल. चंद्रपूर जिल्ह्यातही नावात बदल करण्यात आले आहे.
डॉ. विलास डांगरेंसह महाराष्ट्रातील 14 दिग्गजांना Padma Awards जाहिर
ब्रह्मपुरीच्या आयटीआयला स्व. यशवंत बाजारे नाव मिळालं आहे. मूलच्या संस्थेला मा. सा. कन्नमवार यांचं नाव असेल. सिंदेवाहीच्या संस्थेला रामभाऊ बोंडाळे नाव असेल. गोंडपिपरी आयटीआय नल-नील नावानं नवी ओळख मिळवेल. राजुराच्या आयटीआयला लाला लाजपत राय यांचं नाव देण्यात आलं आहे. चंद्रपूरची आयटीआय आता ऋषी अगस्त्य नावानं असेल. आचार्य प्रफुल्ल चंद्र रे हे नाव नागभीडच्या आयटीआयचं आहे. सावलीच्या संस्थेचं नामकरण क्रांतीकारी खुदीराम बोस यांच्या नावावर करण्यात आलं आहे. वरोरातील आयटीआय गजानन पेंढारकर यांच्या नावावर असेल.
Nagpur जिल्ह्यातही बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्यातील अनेक आयटीआयचं नावही बदललं आहे. हिंगणाची संस्था आता श्री संत गमाजी महाराज यांच्या नावानं ओळखली जाईल. कळमेश्वरची स्व. आप्पासाहेब हळदे यांच्या नावानं असेल. कुहीच्या आयटीआयला श्री संत रूख्खड महाराज यांचं नाव मिळालं आहे. नरखेडची आयटीआय श्री अमृत महाराज यांच्या नावानं ओळखली जाईल. सावनेरच्या आयटीआयला स्व. अण्णाजी कुबीटकर नाव असेल. उमेदरेडच्या संस्थेचं नाव स्व. भय्याजी दाणी करण्यात आलं आहे. काटोलची आयटीआय महर्षी पजंजली या नावानं यापुढं ओळखली जाईल. बेलदा येथील संस्थेचं नामकरण चित्तूर सिंह करण्यात आलं आहे.
नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम
बुलढाण्याच्या आयटीआयचं नाव श्री पलसिद्ध महास्वामी असेल. देऊळगावराजाचं संत चोखामेळा, जळगाव जामोदचं राजा भर्तुरी, मेहकरचं काशिनाथ नारायण मगर असं असेल. लोणार आयटीआयचं नाव परमवीर चक्र विजेता कॅप्टन मनोजकुमार पांडे यांचं असेल. मलकापूर आयटीआयचं नाव राजे नेमीवंत असेल. मोताळ्याच्या आयटीआयला आता सेवागिरी बाबा नावानं ओळखलं जाणार आहे. सिंदखेडराजा आयटीआय राजे लखुजीराव जाधव यांच्या नावानं भूषविली जाईल. चिखली आयटीआयचं नाव महाराजा रणजित सिंह असं असेल. नांदुरा महर्षी पाणिनी, संग्रामपूर कल्पना चावला यांच्या नावानं असेल.
बदलात Bhandara जिल्हाही
भंडाऱ्याची आयटीआय रामभाऊ आसवले, लाखांदूरची नामदेवराव दिवटे, मोहाडीची परवीर चक्र विजेता मेजर धन सिंह थापा यांच्या नावानं ओळखली जाईल पवनीच्या आयटीआयला महासती बेनाबाई यांचं नाव मिळालं आहे. तुमसर सम्राट पृथ्वीराज चौहान असं नाव असेल. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव आयटीआय आजीबाई बानारसे नावानं असेल. नेरची शहीद किशोर वामनराव कुनगर, पुसदची लोकनायक बापुजी अणे, उमरखेड हुतात्मा मधुकर चौधरी नावानं असेल. कळंबच्या संस्थेच्या नावातही बदल झाला आहे. संस्थेला सेनापती लचित बोरफुकन नाव दिलं आहे. दिग्रस आयटीआयला सर जगदीशचंद्र बोस, घाटंजीला वर्गीस कुरीयन, गुंजला डॉ. शांती स्वरूप भटनागर नाव मिळालं आहे.
Wardha जिल्ह्याचा समावेश
वर्धाच्या आयटीआयला पांडुरंग सदाशिव खानखोजे नाव असेल. समद्रपूरला ऋषी भगीरथ, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडला स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल बंग, मंगरूळपीरला स्वातंत्र्य सैनिक दामोधरदास राठी नाव असेल. रिसौडचं नाव रामानुजाचार्य असेल. मालेगावचं नाव महर्षी नागार्जुन असेल. वाशिमच्या संस्थेचं नाव मादाम कामा असेल.