महाराष्ट्र

Nana Patole : आतंकवाद्यांचा हल्ला पहलगामवर अन् पटोलेंचा हल्ला सरकारवर 

Congress : देशात होतोय धमाका पण सरकार घेतय बघ्याची भूमिका 

Author

देशात वाढत्या धार्मिक तेढीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देश विघटनाच्या उंबरठ्यावर असताना, सत्ताधारी केवळ राजकारणात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात सध्या वाढत चाललेल्या धार्मिक ध्रुवीकरणावर आणि भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर पाठवले यांनी टीका केली. पटोलेंनी भाजपवर धर्मांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला. विशेषतः नीलेश राणे यांच्या विधानांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, भाजपच्या मंत्र्यांच्या वकृत्वामुळे देशात असहमती आणि धार्मिक तेढ वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र बिहारच्या निवडणुकीत गुंतलेले आहेत.

नाना पटोले म्हणाले, भाजपचे मंत्री आणि खासदार एका बाजूला ‘मोदी आहेत म्हणून सर्व काही सुरक्षित’ असे नारे देतात, आणि दुसऱ्या बाजूला देशात धार्मिक विघटन घडवत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी एकदिलाने लढण्याची गरज असताना, भाजप राजकारणासाठी जनतेला विभागण्याचे काम करत आहे. पटोलेंनी यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, जेव्हा भारतावर आक्रमण झाले होते, तेव्हा इंदिरा गांधींनी थेट पाकिस्तानात घुसून लाहोरला दणका दिला होता आणि पाकिस्तानचे विभाजन केले होते. पण आजची सरकार फक्त भाषणबाजी करण्यात धन्यता मानते.

फडणवीसांवर निशाणा

नाना पटोलेंनी या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी संतप्त शब्दांत म्हटले, अमित शहांना जर चेहऱ्यावर नाही, तर किमान डोक्यात थोडीशी तरी लाज असायला हवी. भाजप सरकारने आपल्या चुका मान्य करून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पटोलेंनी लक्ष केले. त्यांनी म्हटले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेचा गंभीर आत्ममंथन करायला हवा. नेमके काय घडले, कोण या सगळ्यामागे आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. सरकारने जनतेची फसवणूक न करता खरे गुन्हेगार समोर आणायला हवेत. नाना पटोले यांनी म्हटले की, काँग्रेस सध्या भाजपने पसरवलेल्या विघटनवादी राजकारणाचा सामना करत आहे. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस मागे हटणार नाही.

Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षादलांनी एक दहशतवादी चळवळीशी संबंधित गटाचा बंदोबस्त केला आहे. पहलगाम परिसरात वाढत्या दहशतवादी हालचालींना रोखण्यासाठी सध्या गस्त आणि तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. परंतु लष्कर आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. केंद्र सरकारने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणार.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!