महाराष्ट्र

काँग्रेस नेते Nana Patole यांचा महायुती सरकारवर घणाघात

भाजपा महायुती सरकारच्या काळात Maharashtra मध्ये गुंडाराज

Author

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

बीडमध्ये राजकीय आशिर्वादाने सुरू असलेल्या गुंडगिरीचा बिमोड करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. बीडच्या घटनांमागे हात असलेल्या मंत्र्याला बाहेर करा असे देखील पटोले म्हणाले आहेत. परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला कलंक आहे.

संताच्या भूमीवर डाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू घला. ही पोलिसांनी केलेली हत्या आहे. या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई का केली नाही? असा सवाल पटोले यांनी केला.

महाराष्ट्रात राजकीय आशिर्वादाने सुरू असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करावा असे ते म्हणाल. विधानसभेत परभणी व बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारचे वाभाडे काढले. ते पुढे म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे.

बीडमधील वाल्मिक कराडवर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्याला पोलिस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी पटोले यांनी केली.

Police Protection कसे?

कराड याला कशासाठी पोलिस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला. त्यात गीते यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. या घटनेवेळी पोलिस निरीक्षक महाजन व पाटील नावाचे पोलिस उपनिरीक्षक त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलिस विभागात कार्यरत आहेत.

वाल्मिक कराडच्या आदेशाने पोलिस विभागातील बदल्या होत आहेत का? बीडची घटना अत्यंत गंभीर आहे. त्याला राजकीय आशिर्वाद आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री यात सहभागी आहे, अशी चर्चा आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर केले पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

परभणीची घटना ही कोरगाव भीमा सारखीच आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले. दुकाने बंद झाली. पोलिसांनी घटना झाली, त्यावेळीच योग्य ती कारवाई केली नाही. कारवाई केली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या.

परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला. जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीने मारहाण केली. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? परभणीतील घटना सरकार प्रायोजित होती का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

Parinay Fuke शब्द टाकणार अन् देवाभाऊ नाही ऐकणार, ‘हो ही नही सकता’

निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिस लाठीचार्जचा व्हिडीओ शूट करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस कोठडीत बेदम मारहाण केली. सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली. पण सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केली नाही.

बीडच्या घटनेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दोन दिवसात 200 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस काय करतात? पोलिस शासनाचे ऐकताच की गुंडाचे? मुख्यमंत्री सक्षम आहेत. तरीही राज्यात अनागोंदी कारभार चालतो कसा? बीडमध्ये एका गुंडाची दहशत आहे, त्याचा ‘आका’ कोण? हे समजले पाहिजे, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्रात फोफावलेल्या या गुंडाराजचा आता अंत झाला पाहिजे. भाजपा महायुती सरकारच्या काळात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांना न्याय मिळत नाही. पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका, बिल्डर हिरानंदानी व पोलिसांच्या मदतीने तोडून टाकली.

या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात पोलिस, बीएमसी प्रशासन व बिल्डर हिरानंदानीला दोषी ठरवले आहे. पण आजही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही, असेही नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिली.

आंबेडकरांचा अवमान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात अवमान केला. याप्रकरणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी नागपूरमध्ये आंदोलन केले.

नागपूर येथील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आघाडीच्या आमदारांनी या आंदोलनाला सुरुवात केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!