
भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांवरील वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ उडाला. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी केली असून सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापत आलेल्या वादळामुळे गदारोळ उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणातील पात्रस्थ विधानांची मालिका सुरू आहे. कोणीतरी कोणावर शाब्दिक तोफा ढकलतोय तर कोणी जिभेवरील ताबा हरवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या सगळ्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र नेहमीप्रमाणे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अत्यंत संवेदनशील बनलेला आहे. या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
विरोधकही या विषयावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेले वादग्रस्त विधान म्हणजे शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल हे आमच्या पैशातून चालतात, हे विधान सोशल मीडियावर झपाट्याने पसरले आणि त्यावर प्रतिक्रिया धुमाकूळ घालू लागल्या. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 30 जुलैपासून विधानसभेचे कामकाज जोरात सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार वाद रंगला.

Nana Patole : भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्रिभाषा सक्तीचा प्रयोग
सभागृहाचे कामकाज ठप्प
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी लोणीकर यांच्या विधानावर आपले तीव्र मत मांडले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्याचा इशारा दिला. ही चर्चा इतकी तणावपूर्ण झाली की सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. विरोधकांनी मुख्यमंत्री माफी मागा मुख्यमंत्री माफी मागा असे जोरदार नारे घालत सभागृहात हाहाकार उडवला. शेतकऱ्यांचा अपमान झाल्याचा मुद्दा पटोलेंनी जोरदारपणे मांडला, पण याच वेळी त्यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याने सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हाक देत ५ मिनिटांसाठी सभा तहकूब केली.
वादाच्या सुरुवातीला नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी ठाम मागणी केली. हा वाद इतका चिघळला की, नाना पटोले थेट विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर धावून गेले. पटोले यांची आक्रमक भूमिका बघता राहुल नार्वेकर यांनी पुढील कारवाईसाठी जबरदस्ती करू नका, असं स्पष्ट सांगितलं. आपण जागेवर बसावं आणि कामकाज सुरू ठेवावं नाहीतर मला पुढील कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. परंतु विरोधकांचे आवाज इतके वाढले की, नाना पटोले स्वतः अध्यक्षांच्या डायसवर चढून थेट राजदंडापुढे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्याचा इशारा दिला.
संपूर्ण हंगामात सभागृहात इतका ताप आला की, अध्यक्षांनी नाना पटोले यांच्यावर सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे अधिवेशनातील वातावरण गरमागरम झाले आहे. शेतकरी प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकीय वादळात अजूनच तळ माजल्याचे दिसून येते.