भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय रणधुमाळी रंगली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते.
सध्या महाराष्ट्रात Assembly Election साठी प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील आपल्या साकोली या मतदारसंघाकडे प्रचंड दुर्लक्ष करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता एक वक्फ बोर्डाच्या हितासाठी सरसावले आहेत. या कळवळ्यातून नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार येताच वक्फ बोर्डाची ढाल बनण्याचा शब्द दिला आहे. काँगेस वक्फ बोर्डाच्या बाजुने आहे. त्याच पक्षाचे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. वक्फ बोर्डासाठी सध्या ऑल इंडिया मुस्लिम उलेमा संघटना लढा देत आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्डाबाबत कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. आपले प्राण गेले तरी अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आता नाना पटोले यांनी घेतली आहे.
अलीकडेच All India Muslim Ulema संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांची भेट घेतली. त्यावेळी पटोले यांनी आम्ही तुमच्या हिताचे काम करू असे वचन त्यांना दिले. या सर्व घडामोडीत ऑल इंडिया मुस्लिम उलेमा संघटनेच्या 17 मागण्या नाना पटोलें पूर्ण करणार आहेत. यात 2012 ते 2024 पर्यत्न मुस्लिम समाजावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे. वफ्फ बोर्डसाठी 1 हजार कोटी रुपये मागण्यात आले आहेत. मशिदीच्या ईमामासाठी 15 हजार रुपये महिना मानधन मागण्यात आले आहे.
नरेंद्र भोंडेकरांसाठी Bhandara मध्ये शिंदे पितापुत्र फ्रंटफूटवर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी आदी प्रमुख मागण्या आहेत. महाविकास आघाडीची सरकार आल्यास या मागण्यावर निर्णय घेऊ असे ही नाना पटोलें म्हणाले आहे.यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वेळी नाना पटोले यांनी आपली व्यक्त केलेली भूमिका अधिक चर्चेत येऊ लागली आहे.यामुळे एका खास समाजाचे प्रेम तेवढे दिसले, असा आरोप आता पटोले यांच्यावर होत आहे. (Congress Leader Nana Patole Taking side of Muslim In Maharashtra)
बौद्ध समाज नाराज?
नाना पटोलें एका विशिष्ट समाजाला खुश करत असले तरी यंदा त्यांची परंपरागत ‘व्हॉट बँक’ दुखावली गेली आहे. यंदाची निवडणूक एससी प्रवर्गासाठी शेवटची होती. त्यानंतर भंडारा- पवनी मतदारसंघ सर्वसामान्य उमेदवारासाठी खुला होईल. त्यामुळे नाना पटोले यांनी बौद्ध समाजाला नाराज केले, अशी ओरड सुरु झाली आहे. त्यामुळे काँग्रेस बंडखोर प्रेमसागर गणवीर यांना मिळत असलेला प्रतिसाद बरेच काही बोलून जात आहे. या नाराजीचा परिणाम नानांच्या साकोली मतदारसंघात दिसेल, असेही बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नानांच्या बाजूला असलेला हा समाज मात्र विधानसभेत नाना विरोधी असल्याने नानांना नाराजीचे धनुष्य पेलावे लागणार आहे.