महाराष्ट्र

अरे रे… Election मध्ये वाऱ्यानी दिशा बदलविली

नरेंद्र पहाडे यांची Political Campaigning मध्ये मुसंडी

Share:

Author

विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही तासांवर आहे. अशा परिस्थितीत भंडारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. वाऱ्याची दिशा अचानक बदलली आहे.

वातावरणात कधी बदल घडेल याचा नेम लावता नाही. अगदी तसेच राजकारणात कधी कोणाच्या बाजूने वारे असतील हे सांगता येत नाही. हे वारे कधी कोणाच्या विरोधात बदलतील याचाही नेम नाही. चारही बाजूने वारे वाहिले की, केंद्रस्थानी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यानंतर वारे आपली दिशा बदलवितात. यांची प्रचिती सध्या भंडारा- पवनी क्षेत्रात आली आहे. आता पर्यंत विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे असणारे वारे बदलले आहेत. नरेद्र पहाडे यांच्या बाजूने हे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अचानक नरेंद्र पहाडे यांचे पारडे जड झाले आहे.

मतदानासाठी अवघे काही तास राहिले आहेत. आता पर्यंत चर्चेत असलेल्या नरेंद्र पहाडे यांनी अचानक प्रचारात मुसंडी मारली आहे. कालपरवा पर्यंत 50 ते 60 हजारावर असलेले पहाडे आज अचानक 80 ते 90 हजारांवर पोहोचले आहेत. सोबत कोणतेही मोठे नेते प्रचाराला नाही. अभिनेत्याचा दिखावा नाही. प्रचार साधेपणाने सुरू असताना पहाडेंना ही जादू कशी जमली? याचा शोध राजकीय जाणकार घेऊ लागले आहेत.

ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की

अदृश्य ‘हात’ करतोय Support

पहाडे यांची बाजू अचानक वर येण्यामागे राजकीय जाणकार अनेक गोष्टी कारणीभूत मानत आहेत. राजकारणातील अदृश्य शक्तीचा ‘हात’ पहाडेवर असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. आमदार भोंडेकर यांच्या बरोबर असलेले नेते युतीधर्मामुळे सोबत असल्याचा दिखावा करीत आहेत. जिल्ह्यातील अद्याप एका ‘घडीधारी’ आणि ‘हेव्हीवेट’ नेत्याने प्रचारात उडी घेतलेली नाही. त्याची अदृश्य शक्ती पहाडेंना ‘चार्जिंग’ पुरवित आहे.

राजकारणातील या अदृष्य शक्ती पहाडेंना मिळाली असल्याचे बोलले जात आहे. भाजप कार्यकर्तेही याच ‘नरेंद्र’ कडे झुकल्याचे दिसत आहेत. राजकीय वाऱ्यांनी अचानक जागा बदलल्याने एका नरेंद्रमुळे दुसरा नरेंद्र राजकारणाच्या समुद्रात त्सुनामीमध्ये अडकणार की काय, असे दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी नरेंद्र पहाडे नंबर एकवर आले आहेत.

पहाडेंचे Plus Points

नरेंद्र पहाडे यांची स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळे मतदार क्षेत्रात मिळालेली प्रसिद्धी त्यांची जमेची बाजू ठरली आहे. आतापर्यंत ‘जिसका माहौल, उसके साथ हम’ असे होते. ‘माहौल’तयार होण्याचा प्रतिक्षेत असलेला मतदार अखेर आपल्या निर्णयावर पक्का झाला आहे. अपक्ष उमेदवार जिल्ह्याचा विकास करू शकत नाही, ही प्रतिमा स्वत: विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खोडून दाखविली. त्यामुळे त्याचा इतका फरक पहाडेंविरोधात होईल, असे वाटत नाही. ही सर्व जमेची बाजू पहाढे यांच्याकडे पहायला मिळत आहे.

काँग्रेस-भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराज नेते छुप्या पद्धतीने पहाडेच्या बाजूने काम करू लागले आहेत. पहाडे हिंदू दलित असल्याने व्यापारी, कुणबी, त्यातही तेली समाजाचे मताधिक्य पहाडेंना आपल्या बाजूने करता आले आहे. सेवकांचे मत भोंडेकर-ठवकर यांच्याकडे विभाजित झाले आहेत. Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल बौद्ध समाजाची नाराजी आहे. ही नाराजी नरेंद्र पहाडेंना अखेर ‘कव्हर’ करता आली आहे. हे सर्व अवघ्या दीड दिवसात घडले आहे. त्यामुळे पहाडेंच्या बाजूने राजकीय वारे बदलेले कसे यांचा शोध सुरू आहे.

वक्फ बोर्डाच्या मागण्या पूर्ण करणार Nana Patole

सर करणार Mount Everest

नरेंद्र भोंडेकर यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये खोडा ठरलेले पहाडे व त्यांच्या बाजूने असलेले राजकीय वारे फायद्याचे ठरत आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर हे वारे कसे आपल्या बाजूने करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. भोंडेकर यांच्यासाठी दाढीवाल्या ठाणेकर पितापुत्रापासून अनेक जण मैदानात उतरले आहेत. पण एका नरेंद्रला हुलकावणी देत दुसरा नरेंद्र यशाचे पहाडच नव्हे माऊंट एव्हरेंट निवडणूक सर करेल काय, अशी चिन्हे अचानक तयार झाली आहे. असं झाल्यास माऊंट एव्हरेस्ट जसे अनेकांना गोठवून टाकतो, तसेच भोंडेकर यांचे राजकीय करीअर थंडगार होऊ शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!