महाराष्ट्र

Narendra Pahade : राजकारणाच्या आखाड्यातील पहाडे आता डॉक्टर

Social Work Award : भंडाऱ्यातून जन्मलेले नेते दिल्लीच्या व्यासपीठावर झळकले

Post View : 40

Author

भंडाऱ्याचे उद्योजक व समाजसेवक नरेंद्र पहाडे यांना सामाजिक शास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली येथे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

राजकारणाचा झगमगाट, प्रचाराची रणधुमाळी आणि मतांचे गणितं हे सगळं पाहून लोकांच्या डोळ्यांपुढे अनेक चेहरे येतात. मात्र काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांची ओळख फक्त राजकीय नेते म्हणून होत नाही, तर ते समाजासाठी समर्पित कार्यकर्ते म्हणूनही उभे राहतात. अशाच व्यक्तिमत्त्वाची गोष्ट आहे भंडाऱ्याचे नरेंद्र पहाडे यांची. राजकीय पटलावर आत्मविश्वासाने उभे राहणारे आणि समाजाच्या सेवेसाठी झोकून देणारे नरेंद्र पहाडे आता ‘डॉक्टर पहाडे’ म्हणून ओळखले जाणार आहेत. सामाजिक शास्त्र क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्ली येथे भव्य समारंभात त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

देशभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना मिळाला आणि एक वेगळा इतिहास रचला गेला. नरेंद्र पहाडे हे केवळ राजकारणापुरतेच मर्यादित नाहीत. B.Com, MBA आणि LLB अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आता मिळालेली मानद डॉक्टरेट ही त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीतील सुवर्णपान ठरली आहे. शिक्षणासाठी त्यांनी सतत धडपड केली असून समाजासाठी केलेली सेवा हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव राहिला आहे. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून भाग घेतला होता. पराभवाचे दुःख मनात न बाळगता त्यांनी मतदारांचा विश्वास आणि प्रेम आत्मसात केले.

Parinay Fuke : साकोलीत भाजपचे संघटन नव्या उंचीवर

समाजाशी असलेली नाळ

बहुमताचा आकडा गाठता आला नाही, पण लोकांच्या मनात जागा मात्र नक्कीच मिळवली. पदवी स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांतून समाधान झळकत होतं. त्यांनी भावनिक स्वरात म्हटलं, ही डॉक्टरेट माझ्या वैयक्तिक कार्याची नाही, तर भंडारा जिल्ह्याच्या जनतेच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची साक्ष आहे. समाजासाठी कार्य करणे हेच माझे ध्येय आहे, व समोरही राहील. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण आहे. विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळी, हितचिंतक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. नरेंद्र पहाडे यांनी राजकीय व्यासपीठावरून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र पहाडे यांनी हेही दाखवून दिलं की, समाजसेवा केवळ राजकारणाच्या माध्यमातूनच करता येते, असा एक भ्रम आहे. नरेंद्र पहाडे यांनी राजकीय जीवनापेक्षा समाजकार्यामध्ये आता स्वतःला झोकून दिले आहे. प्रत्यक्ष कृतीतून, जनतेशी थेट संपर्क ठेवून, गरजूंना मदतीचा हात देत त्यांनी समाजकार्यालाही नवा आयाम दिला आहे. त्यांचा प्रवास केवळ पदव्या मिळवण्याचा नव्हता, तो होता समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा. आता ‘डॉक्टर पहाडे’ म्हणून ओळख मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याला एका नव्या उंचीची जोड मिळाली आहे. राजकारण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात संतुलन साधत नरेंद्र पहाडे यांनी यशाची उंची गाठली आहे. डॉक्टरेट ही फक्त सन्मान नाही, तर त्यांच्या कष्टांची, संघर्षांची आणि समाजाशी असलेल्या नाळीची कबुली आहे.

Parinay Fuke : आमदारांनी असा मांडला विकासाचा पाढा

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!