महाराष्ट्र

Naresh Mhaske : उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब 

Shiv Sena : बंद मूठ उघडली तर भारी पडेल

Author

तापत्या वातावरणासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापत आहे. खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा तुफान घडामोडी सुरू झाल्या आहेत. खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत, “उद्धव ठाकरेंनी दिलेली ऊर्जा शिंदेंनी वापरली, असा आरोप केला. त्यावर शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिल आहे. तुम्हीच शिंदे साहेबांना नाईलाज म्हणून पाठिंबा दिला, हे विसरलात का? असा सवालही म्हस्के यांनी केला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, आज एकनाथ शिंदे जी सत्ता आणि आर्थिक ताकद दाखवत आहेत, ती उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलेल्या ऊर्जेमुळेच आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना वाढवलं, पुढे नेलं, पण आता तेच घात करत आहेत. यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाण्यातीलच काही लोक हे सांगत होते की, एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल.

Uddhav Thackeray on MNS : महाराष्ट्राला बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही

म्हस्के यांचा पलटवार

संजय राऊत यांच्या या टीकेवर शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही रोज मला फोन करत होतात. तुम्ही स्वतः मला सांगितलं होतं, एकनाथला सांग, मला नाईलाजाने इथे राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नकोस. आता तुम्हीच मोठे निष्ठावान असल्याचा आव आणताय? म्हस्के यांनी इशारा देत म्हटलं, ही बंद मूठ उघडली तर तुम्हाला भारी पडेल. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. पण मी स्पष्ट सांगितलं की मी शिंदे साहेबांसोबत आहे आणि भेटायला येणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंची तुलना औरंगजेबाशी केली. त्यांनी म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप त्रास दिला. त्यांच्या निधनानंतरही ते शिवसेनेच्या विरोधकांसोबत हातमिळवणी करून बाळासाहेबांच्या विचारधारेवर घाला घालत आहेत. औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या भावांचा निघृण खात्मा केला. उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं? आपल्या भावांना आणि पक्षातील निष्ठावंत नेत्यांना दूर केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसंपत्तीला सोडून त्यांनी इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत कोर्टात दावा दाखल केला. हीच त्यांची खरी मानसिकता आहे, असा घणाघात म्हस्के यांनी केला.

Girish Mahajan : वीर जवानाला श्रद्धांजली देताना गंभीर जखमी

तुम्ही शिव्या घातल्या

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की, संजय राऊत, तुम्हीच उद्धव ठाकरेंच्या नावाने शिव्या घालत होतात. तुम्ही मातोश्रीच्या विरोधात नाराजी दर्शवली होती. मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षातील नेत्यांसोबत गुप्त बैठकाही घेतल्या होत्या. तुमच्या भेटी कुठल्या हॉटेलमध्ये झाल्या, हे सगळं जगाला माहिती आहे. म्हस्के पुढे म्हणाले की, शिंदे साहेब कृतघ्न असते, तर राज्यसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत केले असते. ज्यांनी तुम्हाला खासदार केलं, त्यांच्यावरच तुम्ही आज आरोप करत आहात.

संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे या प्रकरणाला काय वळण लागते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!