महाराष्ट्र

Navneet Rana : गोळ्या खाणार पण कलमा नाही वाचणार

Pahalgam Attack : नवनीत राणा यांचा पहलगाम हल्ल्यावर संतप्त हुंकार 

Author

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर क्रूर हल्ला चढवला, श्रद्धेच्या चाचणीत प्राण घेतले. या घटनेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवला.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना थांबवून त्यांचे नाव व धर्म विचारले आणि जबरदस्तीने कलमा (इस्लामी श्रद्धावाक्य) वाचायला लावले. ज्या हिंदू पर्यटकांना कलमा वाचता आले नाही, त्यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या अमानुष घटनेवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

नवनीत राणा यांनी आपल्या मुलाचे उदाहरण देत हिंदूंच्या बळावर भर दिला. त्या म्हणाल्या, माझा मुलगा अजून लहान आहे. मी त्याला सहज विचारले, जर तुला कुणी कलमा वाचायला लावले तर काय करशील? यावर तो ठामपणे म्हणाला की, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. गोळी खाईन पण कलमा नाही वाचणार. राणा यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. पहल्गाममध्ये घडलेल्या घटनेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या हिंदू बांधवांनी तिथे गोळ्या खाल्ल्या पण कलमा वाचला नाही. त्यांनी आपल्या श्रद्धेवर अढळ निष्ठा ठेवली आणि धर्मासाठी प्राणांची आहुती दिली.

भुट्ट्यासारखे भाजणार 

पुढे घणाघाती टीका करत नवनीत राणा म्हणाल्या, जे लोक हिंदुस्थानात राहतात पण या मातृभूमीशी प्रामाणिक नाहीत, त्यांना या देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हिंदू समाजाने आता भगवा टिळा लावून गर्जायचे आहे. पाकिस्तानच्या माजी नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. पाकिस्तानचा भुट्टो म्हणतो, सिंधू नदीचं पाणी थांबलं तर हिंदूंचं रक्त वाहिल. पण मला सांगायचं आहे, अख्ख्या पाकिस्तानमध्येही इतकी ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहील. कारण भारतात नरेंद्र मोदी आणि अमित शाहसारखे वाघ आहेत, अशी राणा यांनी गर्जना केली. आपल्या भाषणात नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, भुट्टोसारख्या लोकांना मोदी भुट्ट्यासारखे भाजतील. आज आपल्या आयपीएलमध्ये जेवढा खर्च होतो, तेवढाच पाकिस्तानचा संपूर्ण जीडीपी आहे.

Devendra Fadnavis : अमरावतीच्या आकाशात संतांचा गंध दरवळणार?

संतापाची लाट 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी एक भयानक कट रचत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी थांबवलेल्या पर्यटकांचे नाव व धर्म विचारले आणि इस्लामी कलमा वाचायला लावला. ज्या हिंदू पर्यटकांना कलमा वाचता आले नाही, त्यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या संपूर्ण काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. या भीषण हल्ल्यात सामील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

या अमानवीय हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन क्लीन अप’ सुरू करण्यात आले आहे. सुरक्षादलांनी शेकडो ठिकाणी ताबडतोब छापे टाकले आहेत. भारत आता केवळ संरक्षणात्मक भूमिकेत नाही, तर आक्रमक प्रतिसाद देण्याच्या धोरणावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर एक शक्तिमान राष्ट्र म्हणून उभा आहे. जो प्रत्येक हिंदुस्थानींच्या सुरक्षिततेसाठी अखंड आणि अडिग उभा राहतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!