महाराष्ट्र

Local Body Election : नवनीत राणांच्या घोषणेने युतीत पळसाचा फटका

Amravati : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबाळाचा नारा

Author

राजकारणाच्या रणभूमीवर नवनीत राणा यांनी स्वबळाचा शंखनाद करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. अमरावती मनपा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता थेट भगव्याचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या चर्चा सध्या जोमात सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर निवडणुकांची प्रक्रिया वेग घेत आहे. अशातच अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आगामी मनपा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजप अमरावती मनपा निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवेल, कोणत्याही पक्षाशी युती केली जाणार नाही.

17 मे शनिवारी अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवनीत राणा बोलत होत्या. हा कार्यक्रम नव्याने नियुक्त झालेल्या भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड

भगवा झळकणार

राणांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आम्ही हवा न करता, जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, असा टोला लगावत आत्मनिर्भरतेचा नारा दिला. भाजप अमरावती मनपा निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवेल, असं ठामपणे सांगत त्यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकला. अमरावती जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर केवळ भगवा झेंडा फडफडला पाहिजे, हेच आमचं लक्ष्य आहे, असं ते म्हणाल्या.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, कोणालाही घाबरण्याची गरज नाही, भाजप ही अशी पक्ष नाही की जिच्यामुळे घाबरावं लागेल. मी खासदार असताना देखील दररोज भाजपसाठी काम केलंय. मी केवळ बोलणारी नाही, तर लोकांसाठी जमिनीवर उतरून काम करणारी व्यक्ती आहे.

Akola BJP : नावाला कात्री लागणाऱ्यांची यादी तयार

मान्सूनपूर्वीच होणार निवडणूक

नवनीत राणांनी आगामी निवडणुकांबाबत भविष्यवाणी करत स्पष्ट केलं की, स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळा संपण्यापूर्वीच पार पडतील. भाजप कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागा. त्यांनी यावेळी आपल्या पराभवाबद्दलही भाष्य केलं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत मला निवडून यायचं होतं. मात्र काही जणांनी विधानसभेतील खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.

नवनीत राणांनी आपल्या भाषणाच्या शेवटी एक सस्पेन्सपूर्ण वाक्य उच्चारलं. :अभी पूरी पिक्चर बाकी है.’ ज्यामुळे उपस्थितांमध्येच नव्हे तर संपूर्ण महायुतीत एक धडकी भरली आहे. त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक भूमिकेमुळे अमरावतीतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांची ही घोषणा केवळ मनपा निवडणुकीची तयारी नसून, अमरावतीत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या निर्धाराचं सूचक आहे. येणाऱ्या काळात त्या कोणत्या नवे पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Devendra Fadnavis : जनतेच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!