महाराष्ट्र

महामार्गाचे पुनर्निर्माण Bhandara मध्ये थांबले काम

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू

Post View : 62

Author

भंडारा जिल्ह्यातील अशोका हॉटेल ते तुमसर बायपासपर्यंतचा मुख्य रस्ता धुळीने माखला आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी घेतली होती. परंतु नवा मार्ग दुरुस्तीची जबाबदारी घेऊनही थांबलेला आहे.

भंडारा जिल्ह्यातील जुना राष्ट्रीय महामार्ग सध्या दयनीय अवस्थेत ाहे. अशोका हॉटेल ते तुमसर बायपास पर्यंतच्या रस्त्याची स्थिती वाईट झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. धुळीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याच्या बांधकामासाठी कोण जबाबदार आहे, याचा अद्यापही ठावठिकाणा नाही. त्यामुळं मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. या मार्गावर चालणेही मोठे आव्हान बनले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांनी या मार्गाच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. दलाल यांनी सांगितलं की, अशोका हॉटेल ते तुमसर बायपास हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रस्ता केवळ भंडारा शहराच्या वाहतुकीसाठी महत्वाचा नाही. वरठी, मोहाडी, तिरोडा, गोंदिया आणि इतर सुमारे 25 गावांसाठी एक महत्त्वाची वाहतूक लिंक म्हणजे हा रस्ता आहे.

कधी होणार Highway दुरूस्त?

काही वर्षांपूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग होता. परंतु आता या मार्गाची अवस्था खराब झाली आहे. पूर्वी हा मार्ग जड वाहतुकीसाठी वापरला जात होता. सध्या या मार्गावरूनच बीटीबी मार्केट, मच्छी मार्केट, बैल बाजार, स्मशानभूमी, साई मंदिर, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, एसटी आगार यासाठी प्रवास करणारे नागरिक नियमितपणे येणे-जाणे करीत असतात.

कामगारांच्या सुरक्षेला Labour Minister कडून ‘टॉप प्रायोरिटी’

जुन्या हायवेवरून सध्या जड वाहने वळवली जात आहेत. त्यामुळे मार्गावरील धुळ आणि रस्ता खचलेला आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कृती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीने गरज असतानाही प्रशासन याकडं दुर्लक्ष करीत आहे.

गोसीखुर्द पुनर्वसन विभागाने बायपास मार्गाच्या रॅम्पसाठी डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु ते अद्याप अपूर्ण आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या रॅम्पवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रक आणि इतर मोठी वाहने वळवताना हा मार्ग धुळीने माखला जात आहे. त्यामुळे नागरिकांना गंभीर आरोग्य आणि वाहतुकीच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे.

PWD जबाबदारी घेणार का?

सध्या भंडारा शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे, असे सांगितलं जात आहे. संबंधित विभागाला मार्गाच्या दुरुस्तीबाबत काहीच माहिती नाही. यावरून प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय दलाल यांनी प्रशासनाला या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अल्टीमेंटम दिला आहे. कामाची तातडीने सुरुवात करावी. बायपास रॅम्पच्या डांबरीकरणाच्या कामाला गोसखुर्द पुनर्वसन विभागाने ताबडतोब प्रारंभ करावा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मार्गाच्या दुरुस्ती कामाला जितका विलंब होईल, तितकाच भंडारा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडेल. त्यामुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची झाली आहे, असे दलाल यांनी म्हटले आहे. रस्त्याची अवस्था खराब असल्यानं नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. त्यामुळं दलाल यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!