महाराष्ट्र

सकाळी 5 वाजता उठण्याचा सल्ला देणारा Amol Mitkari यांचा टोला!

Farmer Issue सुटणार

Post View : 18

Author

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सकाळी 5 वाजता उठून कामाला लागण्याचा सल्ला दिला.

MNS अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मांडलेली भूमिका चांगलीच गाजतेय. निवडणुकांच्या निकालावर त्यांनी संशय व्यक्त करत अजित पवारांच्या यशावर प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र, या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सकाळी पाच वाजल्यापासून कामाला लागण्याचा सल्ला देत जोरदार पलटवार केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांचे 8 खासदार, 10 आमदार, अजित पवारांचे मात्र तब्बल 41 आमदार आले. चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका बदल कसा झाला? हा संशोधनाचा विषय आहे. यावर मिटकरींनी टीका करत म्हटले, पहाटे उठून काम केलं तर यश येतं, राज ठाकरेंनी याचा विचार करायला हवा.

शिवसेनेच्या मुखपत्रातून Devendra Fadnavis यांचं कौतुक

मिटकरींचा थेट हल्ला

मिटकरी म्हणाले, राज ठाकरेंना उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे, विधानसभेतील पराभवानंतर दीड महिन्यांनी त्यांना शॉक बसला आहे. स्वतःच्या मुलाचा पराभव का झाला याचा विचार त्यांनी करावा. लोकांनी मतदान केलं, फक्त तुम्हाला यश मिळालं नाही. तुमच्या पक्षाच्या जागांवर विचार करण्याऐवजी इतरांच्या जागांचा अभ्यास करण्याची गरज नाही.

राज ठाकरे यांनी भाजपच्या वाढलेल्या जागांवर आणि अजित पवारांच्या यशावर संशय व्यक्त केला. अजित पवारांना 42 जागा कशा मिळाल्या हे कुणालाच समजत नाही. तसेच, शरद पवारांना कमी जागा मिळाल्याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र, मिटकरींनी त्यांच्या या भूमिकेला ताशेरे ओढत सकाळपासून कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटले की, राज ठाकरे निवडणुकांनंतर आता नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!