
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. अशात अजित पवार गटातील धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने अजित पवार यांच्या नेत्यांना कोंडीत पकडत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर आता संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाने अजित पवार गटातील नेत्यांना टार्गेट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आधी बीडमध्ये धनंजय मुंडेंना धारेवर धरले गेले आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शरद पवारांच्या नेत्यांसाठी टीकेचे नवे लक्ष्य ठरले आहेत. एकामागून एक नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावान शिलेदार धनंजय मुंडे यांना धारेवर धरले. सरपंच संजय देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर शरद पवारांच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या निर्णयांवर आणि भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले.
chandrashekhar Bawankule : फडणवीस-शिंदे युती म्हणजे फेव्हिकॉल
येऊ शकतात अडचणीत
राजकारणात मूल्ये आणि निष्ठा महत्त्वाची असतात. पण काही जणांना फक्त सत्ता हवी आहे. लोकशाहीत जनतेचा विचार न करता केवळ पदासाठी धावणाऱ्यांना जनता वेळोवेळी धडा शिकवत असते, अशा शब्दांत अजित पवार गटावर टीका करण्यात येत आहे. हे वक्तव्य धनंजय मुंडे यांच्यासाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे. धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिंदे सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण शरद पवार यांची ही खेळी त्यांना आगामी निवडणुकीत अडचणीत आणू शकते.
धनंजय मुंडेंनंतर आता शरद पवार गटाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरले आहे. शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ नेते मानले जातात. शरद पवार गटाने कोकाटे यांच्या कृषी धोरणावर टीका करत सरकारला जाब विचारला. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती आहे, बाजारात हमीभाव मिळत नाही, शेतमालाला योग्य दर नाही. पण कृषी मंत्री काय करत आहेत? शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची तुलना भिकाऱ्यांशी करत आहेत, असा घनघात शरद पवार गटाने केला आहे. या टीकेमुळे कोकाटेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकरी हे राज्यातील मोठे मतदारगट आहे. त्यामुळे ही टीका कोकाटेंना मोठा फटका देऊ शकते.
MSEDCL : महावितरणच्या वीजदर वाढीचा प्रस्ताव; नागरिक अन् उद्योग जगत अस्वस्थ
पवारांची रणनीती
शरद पवार गटाची ही खेळी फक्त टीका करण्यापुरती मर्यादित नसून, ती एक नियोजनबद्ध रणनीती असू शकते. धनंजय मुंडेंना बीडमध्ये घेरले. बीड येथे सरपंचाची हत्या करण्यात आली. यामध्ये वाल्मीक कराड मुख्य आरोपी सापडला. वाल्मीक कराड सोबत धनंजय मुंडे यांचे जवळीक असल्याने त्यांच्या राजकीय भूमिकांवर संशय निर्माण केला.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर शेतकरी प्रश्नांवरून हल्ला करण्यात येत आहे. त्यांना अपयशी ठरवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यापुढे अजित पवार गटातील इतर नेतेही लक्ष्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटात अस्वस्थता वाढेल. यामुळे अजित पवार गटातील नेत्यांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण करण्याचा शरद पवारांचा डाव असू शकतो.
राजकीय रणसंग्राम उफाळणार
अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन गटांमधील वाद आणखी तीव्र होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार गटाच्या टीकेला अजित पवार गट कसा प्रतिउत्तर देणार? शरद पवारांची पुढील खेळी काय असेल? ही टीका धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम करेल? हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या राजकीय घडामोडींवर लागले आहे.