महाराष्ट्र

आंतरजातीय विवाहातील ऑनर किलिंग रोखण्यासाठी Safe House निर्माण करावे

विधानपरिषदेच्या उपसभापती Nilam Gorhe यांचे निर्देश 

Author

राज्यात आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहामुळे होत असलेल्या ऑनर किलिंगला रोखण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश.

आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह झालेल्या नवीन जोडप्यांना लग्नानंतर सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकरणात वाद विकोपाला जाऊन बेदम मारहाण देखील होते. इतकेच नव्हे तर खुना पर्यंतच्या घटना घडतात. त्यामूळे राज्यात ऑनर किलिंग सारख्या घटना थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह (सेफ हाऊस) अंमलबजावणी करण्यात यावी. या बाबतचा सविस्तर अहवाल 30 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावा. ऑनर किलिंगच्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे. तसेच पीडित महिलेला मनोधैर्य योजनेतून काही लाभ देता येईल का पाहावे आणि मदत करावी. त्यामुळे अशा मुलींना फार मदत होणार. ऑनर किलिंगमधील पीडित महिलांना कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासात यावे. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही नीलम गोरे यांनी दिल्या आहेत.

Navneet Rana म्हणाल्या, शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड..

Committee केली होती गठीत 

आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या कौटुंबिक त्रासातून आणि सामाजिक मानहानीतून सामोरे जावं लागतं. ऑनर किलिंगपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्यात यावे. महिलांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळाली पाहिजे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावी. ज्यामुळे पीडित महिलांना कायदेशीर मदत आणि सुरक्षितता वेळेत उपलब्ध होणार. या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणार, असेही विधान परिषदेचे उपसभापती निपा. गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यात ऑनर किलींगच्या घटनांनी जोर धरल आहे. छत्रपती संभाजीनगर लातूर, कोल्हापूर येथे ऑनर किलींगच्या घटना घडल्या. त्यानंतर सोमवारी 13 जानेवारी रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीला महिला व बालविकास आयुक राहुल मोरे, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक कोल्हापूर, लातूर आयुक्त, महिला व बालविकास विभाग,आयुक्त सामाजिक न्याय विभागाचे संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!