महाराष्ट्र

Gondia : रेल्वे विकासाला नवे पंख 

Indian Railways : गोंदियाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला ऐतिहासिक गती

Author

गोंदियाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे विदर्भात रेल्वे सेवा आणि औद्योगिक विकासाला नवे वळण मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र , छत्तीसगड आणि ओडिषा राज्यातील रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी तब्बल चार हजार 819 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्र तसेच विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे वाहतुकीस गती मिळेल आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 4 एप्रिल शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प गोंदियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विदर्भातील गोंदिया हा रेल्वेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र असून, येथे प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही मोठ्या प्रमाणात होते. सध्या या मार्गावर रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुपदरीकरणानंतर ही समस्या दूर होणार आहे.

Nagpur : वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सिंगल स्टाईल फ्लॅग मार्च

संपूर्ण विदर्भाला लाभ

प्रकल्पामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना फायदा होणार आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि बल्लारशाह या भागातील रेल्वे वाहतुकीत सुलभता येईल. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील केली जाते. दुपदरीकरणामुळे मालवाहतूक वेगवान होणार असून उद्योगांना मोठा फायदा होईल.

गोंदिया आणि बल्लारशाह मार्गाच्या विकासासोबतच, वडसा ते गडचिरोली या नक्षलग्रस्त भागातील रेल्वे संपर्क वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील आर्थिक हालचालींना चालना मिळेल. ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधून येणाऱ्या मालवाहतुकीस गती मिळेल, परिणामी महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होईल.

नवा रेल्वेमार्ग

छत्तीसगडसाठी नवी रेल्वे मार्ग योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने छत्तीसगडमध्ये दोन नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. खरसिया – नया रायपूर – परमलकसा या मार्गावर आठ हजार 741 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प एका समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरप्रमाणे असेल. यामुळे प्रवासी रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. 21 नवीन स्थानके, 48 मोठे पूल आणि 5 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. तसेच, 21 ते 38 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक केली जाऊ शकते.

Gondia : सुनील मेंढे यांचा द्रष्टेपणा, गोंदियाच्या रेल्वे नेटवर्कला मोठी चालना 

ओडिशातील रेल्वे मार्ग विस्तार प्रकल्प ओडिशातील रेल्वे वाहतुकीला चालना देण्यासाठीही मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. जरापडा (तालचेर-अंगुल क्षेत्र) – संबलपूर या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गास मंजुरी देण्यात आली असून, यासाठी तीन हजार 917 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे कोलकाता ते मुंबई या प्रमुख रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. तसेच, संबलपूर – झारसागुडा हा एक हजार 181 कोटी रुपये खर्च असलेला 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला आहे.

हरित विकास

पर्यावरणपूरक प्रकल्प आणि पर्यटनाला चालना या नव्या रेल्वे प्रकल्पांमुळे पर्यावरणालाही मोठा फायदा होणार आहे. एकूण 113 कोटी किलोग्रॅम CO2 उत्सर्जन वाचवले जाईल, जे ४.५ कोटी झाडे लावण्याइतके परिणामकारक ठरेल. तसेच, रेल्वेमार्गाच्या विस्तारामुळे विदर्भातील ताडोबा आणि अन्य व्याघ्र प्रकल्पांमधील पर्यटनाला देखील चालना मिळेल.

गोंदियातील प्रवाशांना आता जलद आणि सोयीस्कर रेल्वेसेवा मिळणार असून, व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही फायदा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोंदिया रेल्वे नेटवर्कच्या दृष्टीने आणखी बळकट होणार असून, संपूर्ण विदर्भातील आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल. त्यामुळे गोंदियासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आह. 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!