महाराष्ट्र

Nitin Gadkari : नव्या रोपवे प्रकल्पाने रामटेक मंदिराचा प्रवास होणार सुलभ

Ramtek : गडाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग आता गडकरी स्टाईलने

Share:

Author

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरावर 151 कोटी रुपयांच्या रोपवे प्रकल्पाची घोषणा केली

रामभक्तांसाठी विशेष असलेला रामनवमी उत्सव लवकरच दारात येऊन ठेपला आहे. चैत्र शुद्ध नवमीला संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामभक्तांसाठी मोठी भेट दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिरात रोपवे प्रकल्प सुरु होणार आहे. सरकारकडून भक्तांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडकरी यांच्या पुढाकारामुळे रामटेक आता महाराष्ट्रातील एक भव्य आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या रामटेक गड मंदिरातील दर्शन आता आणखी सोपे होणार आहे. प्रसिद्ध रामटेक गड मंदिरात आता रोपवे सुविधा उपलब्ध होणार आहे. 635 मीटर लांबीचा हा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल 151 हजार 50 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा विकास, संचालन आणि देखभाल यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. येथील यात्रेकरूंना आता मंदिरात पोहोचण्यासाठी अधिक सोय होणार आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले.

भक्तांसाठी सुविधा

अवघ्या काही दिवसांत रामनवमीला सुरवात होणार आहे. रामटेक हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. असे मानले जाते की भगवान श्रीराम वनवासाच्या काळात येथे काही काळ वास्तव्यास होते. दरवर्षी जवळपास  आठ लाख भाविक रामटेक गड मंदिराला भेट देतात. सध्या यात्रेकरूंना मंदिरात पोहोचण्यासाठी दोन पर्याय आहेत. कार पार्किंगपासून 120 पायऱ्या चढणे किंवा टेकडीच्या तळापासून मागील बाजूस असलेल्या 700 पायऱ्या पार करणे. मात्र, हा प्रवास अनेक भाविकांसाठी कष्टदायक ठरतो.

Parinay Fuke : विषयांतर संभ्रम निर्माण करणे हीच ठाकरेंची रणनीती

धार्मिक विकासाला चालना

रोपवे प्रकल्पासाठी अत्याधुनिक मोनोकेबल फिक्स्ड ग्रिप जिग बॅक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यामुळे दररोज साधारणतः 7 हजार 200 यात्रेकरूंना सेवा देता येणार आहे. रोपवेच्या मदतीने प्रवासाचा वेळ अवघ्या तीन ते चार मिनिटांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे भाविक आणि पर्यटकांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार आहे. हा प्रकल्प केवळ भक्तांसाठीच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. हॉटेल्स, दुकानं आणि वाहतूक यासारख्या व्यवसायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांतच रामनवमी उत्सव संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोट्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यापूर्वीही रामटेकला फिल्मसिटी बनविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. भाजपसरकाकडून आता रामटेकलाही नवीन दिशा मिळण्याचे काम होत आहे. रोपवे प्रकल्प हा नागपूर आणि आसपासच्या भागांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरणार असून, भविष्यात अशा अनेक पर्यटन स्थळांवर अशाच प्रकारच्या सुविधा विकसित केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.

Mohan Bhagwat : शिवाजी महाराज भारताचा स्वाभिमान

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!