
नागपुरात काही विकासकामे अर्धवट रखडली होती. त्या कामांना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून नागपुरातील पाच विधानसभा क्षेत्रांना विशेष निधी प्राप्त झाला आहे. यातून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे नाव वगळल्याने काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप.
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन झाले. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांचे तीर सोडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मुद्दामहून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राला विकास निधीपासून वंचित ठेवत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते तथा उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे.
नागपूरात विकासकामे रखडल्या गेली होती. त्यासाठी राज्य सरकारकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरातील अर्धवट विकासकामांना गतिमान करण्यासाठी 470 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. नागपूरातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्रांमध्येच या विशेष निधीचा वाटप करण्यात आला आहे. परंतु उत्तर नागपूर या एकमेव विधानसभा क्षेत्राला या विशेष निधीच्या वाटपामधून वगळण्यात आल्यानंतर नितीन राऊत यांनी हे आरोप केले आहे.

Devendra Fadnavis यांच्याशी संपर्क साधणार
नितीन राग पुढे म्हणाले, उत्तर नागपुरात मोठ्या संख्येत बौद्ध तसेच अल्पसंख्यांक नागरिक राहतात. फडणवीस सरकार असा दुजाभाव करून येथील बौद्ध तसेच अल्पसंख्यांक नागरिकांना टार्गेट करून विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे. या विषयासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच संपर्क साधणार आहोत, असेही नितीन राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर नागपूर शहरातील तत्कालीन विकास कामांसाठी मंजूर असलेला 169 कोटी रुपयांचा निधी थांबविण्यात आला होता. त्यामुळे नागपूर शहरातील 54 वेगवेगळे विकासकामे अर्धवट स्थितीत अडकून पडले होते. तेव्हा कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून निधी नसल्यामुळे काम बंद करण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये शिंदे आणि फडणवीस यांची महायुती सरकार पुन्हा सत्तेत आली. थांबलेल्या गतिमान कामांना करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. म्हणून त्या सर्व रखडलेल्या कामांना पुन्हा गतिमान करण्यासाठी हा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर झालेला विशेष निधी
पूर्व नागपूर – 160 कोटी
पश्चिम नागपूर – 15 कोटी
दक्षिण नागपूर – 90 कोटी
दक्षिण पश्चिम नागपूर – 150 कोटी
मध्य नागपूर – 30 कोटी
हुडकेश्र्वर नरसाळा – 35 कोटी