महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : पक्षप्रवेशासाठी बैकग्राउंड व्हेरिफाय अनिवार्य

BJP : वडेट्टीवार अजूनही पराभवाच्या धक्क्यात

Author

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे, की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अडचणी वाढल्यानंतर भाजपने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपने नवीन लोकांना पक्षात घेताना अधिक विचारपूर्वक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ‘अवैध धंदे करणारे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक पक्षात घेऊ नका’. भाजपमध्ये केवळ पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना स्थान दिले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यात काँग्रेस समर्थित पक्षातील तब्बल 22 सरपंच आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रसंगी बोलताना बावनकुळे यांनी पक्षवाढीच्या दिशेने महत्त्वाच्या सूचना केल्या. देशभरात भाजपचे 13 कोटी सदस्य झाले आहेत.  महाराष्ट्रात हे संख्याबळ 1 कोटी 46 लाखांवर पोहोचले आहे. आता पुढील लक्ष्य 1 कोटी 51 लाख सदस्यांचे आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावागावांत जाऊन नवीन सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, असे आदेश बावनकुळे यांनी दिले.

PM At Nagpur : एका रोपट्याचा वटवृक्ष होईपर्यंतचा अविरत प्रवास

वडेट्टीवारांना टोला

बावनकुळेंनी स्पष्ट केले की, 50 सदस्यांची भर घातल्याशिवाय कोणालाही सक्रिय सदस्य म्हणून मान्यता दिली जाणार नाही. त्याशिवाय कोणत्याही समितीत किंवा पदाधिकारी म्हणून संधी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.बावनकुळे यांनी पक्षातील शिस्तबद्ध कारभाराचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट इशारा दिला की, ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा अवैध धंद्यांत गुंतलेले लोक भाजपमध्ये नकोत.’ पक्ष वाढवायचा आहे, पण त्यासाठी नैतिकता आणि स्वच्छ प्रतिमा महत्त्वाची आहे. संघटनेत जास्त काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल, मात्र चुकीच्या प्रवृत्तीला थारा नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

कार्यक्रमात बोलतांना त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएस मुख्यालयाला दिलेल्या भेटीवर वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘वडेट्टीवारांना संघ समजायला अजून खूप वेळ लागेल. ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेत अडकले आहेत.’ ते पुढे म्हणाले, संघाबद्दल बोलावे एवढी वडेट्टीवारांची उंची नाही. त्यांना संघाची नीट समज हवी असेल तर प्रथम त्यांनी प्रशिक्षण घ्यावे. केवळ जातीपातींच्या राजकारणावर भर दिल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.

PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका 

पारदर्शक प्रतिमा

बावनकुळे यांनी भाजपच्या विकासवादी धोरणांवर भर देत सांगितले की, पक्षात फक्त मेहनती आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच स्थान मिळेल. भाजप हा पक्ष केवळ संख्येच्या आधारावर नव्हे, तर कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या जोरावर वाढतो. त्यामुळे पक्षात प्रवेश करताना पात्रता आणि निष्ठा या गोष्टी महत्त्वाच्या असतील, असे त्यांनी सांगितले. एकंदरीत, पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाने भाजपने आपली स्वच्छ आणि पारदर्शक प्रतिमा जपण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!