महाराष्ट्र

नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं

विकास करण्यासाठी Maharashtra राज्याला सुवर्णसंधी 

Post View : 80

Author

राज्यात नवीन जिल्हे निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आता राज्यात नवीन जिल्हे निर्माण होतील, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून होऊ लागली होती. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात नवीन जिल्हे निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या राज्य शासनाकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. परंतु अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तयार केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूरच्या विकासाला दिशा; Chandrashekhar Bawankule यांच्या निर्णयांनी प्रकल्पांना वेग

जनतेच्या Expectations पूर्ण करणार

महायुती सरकारला फार मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे आव्हानांसोबत जनतेच्या आशा आणि अपेक्षा खूप जास्त आहेत. जनतेच्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू, कारण एक मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. ज्या बाबींमध्ये आम्ही कमी पडलो तिथे नरेंद्र मोदी आम्हाला सांभाळून घेतात. केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आता ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकरिता सुवर्णसंधी असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

स्वामित्व योजनेच्या अंतर्गत राज्याच्या 15 हजार गावांमधील लोकांना त्यांच्या मालकीसंदर्भातील कागदपत्रे देण्याचे काम चालू झाले आहे. यापुढे शहरी भागात स्वामित्व योजना आणली जाणार. महाराष्ट्रातील एक ही नागरिक पुढील तीन वर्षांत संपत्तीसंदर्भात कागदपत्रांशिवाय राहणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Maharashtra साठी मोठी गुंतवणूक 

राज्यासाठी 15 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक दावोस येथे करण्यात आली आहे. त्यासाठी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत धन्यवाद दिले. फडणवीस सरकार पारदर्शकपणे काम करणार, जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत, असंही बावनकुळे म्हणाले. पालकमंत्रिपद ही शोभेची बाब नाही. जिल्ह्यात शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविणे. पायाभूत सोयी निर्माण करणे आणि जनतेचे प्रश्न सरकारकडे नेऊन ते प्रश्न सोडवून आणणे ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!