महाराष्ट्र

Bacchu Kadu : यंदा राखीचा धागा वचनाचा की फसवणुकीचा?

Maharashtra Politics : रक्षाबंधनाच्या दिवशी भाजपला बच्चू कडूंचा ‘ब्लॅक’ सरप्राईज

Author

प्रहार नेते बच्चू कडू यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांना शेतकरी कर्जमाफी न केल्याबद्दल वेदनेचा काळा राखीचा धागा बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भारतीय परंपरेतील सगळ्या सणांमध्ये अत्यंत प्रामाणिक असलेला सण म्हणजे रक्षाबंनधन. भाऊ-बहिणीच्या नात्याला शोभणारा आणि जवळीक व्यक्त करणारा रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधते. भाऊही बहिणीच्या सुरक्षिततेचे वचन देतो, असं मनापासून प्रतिज्ञा होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा ‘वचन’ कधी तरी कागदावरच फोल ठरत आहे का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात चांगलाच गाजत आहे. अनेक आंदोलने, पैदल यात्रा, उपोषणे झाली तरी यश काही मिळाले नाही. सरकारला सत्तेत येऊन बराच झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठोस काहीच झालेले नाही.

अशा वेदनाग्रस्त परिस्थितीत, बच्चू कडू यांनी रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘वेदनेचा काळा धागा’ बांधण्याचा नवा ठाम निर्णय घेतला आहे.बच्चू कडू म्हणतात, सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सहा लाख शेतकऱ्यांच्या आई, बहिणींचे कुंकू पुसल्या गेले आहे. या वेदनेच्या कथेचा हा काळा धागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी बांधला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या वेदनेचा काळा धागा आणि श्रद्धांजली अर्पणाचा कार्यक्रम बच्चू कडू राबवणार आहेत. या भावनिक निमित्ताने बच्चू कडू यांनी एक मनाला भिडणारी पोस्ट केली आहे, जिथे त्यांनी स्वतःला ‘तात्पुरती लाडकी बहीण’ म्हणत पती, भाऊ व वडील यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी कर्जमाफीची जाहीर मागणी केली आहे.

Nagpur : मृतदेह झाला साक्षीदार, महापालिका विरोधात कुटुंबाचे आंदोलन

विधवा बहिणींचा आवाज

देवाभाऊ, मी तुमची तात्पुरती लाडकी बहीण. निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुरू केली, थेट आमच्या खात्यावर पैसे आले. आम्ही आनंदाने वेडे झालो होतो. पण आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतंय, तुम्ही आमच्या तिजोरीवर डाका टाकलाय, असे भावनिक शब्द बच्चू कडू यांनी लिहिले आहेत. शेतकऱ्यांच्या हृदयाला भिडणारी ही पोस्ट पुढे म्हणते, महाराष्ट्रात दर 3 तासांनी एक शेतकरी आत्महत्या करत आहे. सहा लाख शेतकऱ्यांच्या आई, बहिणींचा कुंकू पुसला गेला. आम्ही विधवा होत आहोत. पण तुम्ही मात्र समित्या नेमून आमची दिशाभूल करत आहात. लाडकी बहीण योजनांच्या नादात सरकारने कर्जमाफीसाठी दिलेल्या आश्वासनांना फसवणूक ठरवले आहे, असेही या पोस्टमध्ये दहा दाणे शब्दांत व्यक्त केले आहेत.

आम्ही तुमच्यावर बहीण म्हणून विश्वास ठेवला, पण आता राजीनामा देत आहोत. आमच्या शेतकरी पती, भाऊ, वडील यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी जाहीर करा. आमचं सिंदूर वाचवा, आम्हाला विधवा होण्यापासून वाचवा, असे आव्हान त्यांनी सरकारकडे केले आहे. राखी हा सण फक्त बांधणीचा नाही, तर भावांच्या मनातील ‘वचनाचा धागा’ही आहे. तो धागा जर तुटला, तर नात्याला कितीही बाहेरून सजावट का केली तरी काही अर्थ नाही. बच्चू कडूंच्या या वेदनाग्रस्त आंदोलनातून महाराष्ट्रातील शेतकरी परिवारांच्या भावना थेट हृदयाला भिडतात. हा काळा राखीचा धागा फक्त एक प्रार्थना आणि श्रद्धांजली नाही, तर सरकारला दिलेले एक निशान आहे की शेतकऱ्यांच्या वेदना ऐका, त्यांना न्याय द्या.

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांची भूमिका दलालीपेक्षा कमी नाही

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!