महाराष्ट्र

माओवाद्यांच्या हल्ल्यात Chhattisgarh मध्ये आठ शहीद 

मोहिमेवरून परत येत असताना झाला Naxal Attack

Author

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांचे वाहन उडविण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) वापरल्याने एक चालक आणि आठ जवान शहीद झाले आहेत. 

माओवाद विरोधी मोहिमेवरून परत येत असताना सुरक्षा दलावर हल्ला झाला. छत्तीसगड मधील विजापूर भागात ही घटना घडली. यात आठ जवान शहीद झाले आहेत. अबुजमाड भागात माओवाद्यांना सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. यात दोन महिलांसह पाच माओवाद्यांना ठार करण्यात आलं. यात एके-47 आणि सेल्फ लोडिंग रायफल्स (SLR) सारखी स्वयंचलित शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर जवान परत येत असताना माओवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. 6 जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास बस्तर भागातील कुत्रू येथून हे नऊ जण ऑपरेशनवरून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

छत्तीसगड राज्यातील माओवादाचा मुकाबला करण्यासाठी विशेष पोलिस तुकडी स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या तुकडीतील आठ सुरक्षा कर्मचारी (DRG) जिल्हा राखीव गार्डचे होते. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा खड्डा पडला होता. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. छत्तीसगडमधील माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागात सुरक्षा दलांनी मोहित तीव्र केली आहे. जंगलात आतपर्यंत शिरत माओवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.

बालकापासून आजोबांपर्यंत सगळेच Parinay Fuke यांना म्हणाले, मिळाले उडण्याचे पंख

हल्ल्याचा CM कडून निषेध

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेचे वर्णन घृणास्पद आणि दुःखद असे केले. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्याची सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. मी खात्री देतो की आमच्या सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही. माओवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद संपविण्याचा संकल्प केला आहे. मला विश्वास आहे की, तोपर्यंत बस्तरचे पाच माओवादग्रस्त जिल्हेही नक्षलमुक्त होती. या जिल्ह्यांमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असेही मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक (IG) सुंदरराज पट्टिलिंगम म्हणाले की, ऑपरेशननंतर छावणीत परत येत असताना आयईडी स्फोट झाला. त्यात जवानांना लक्ष्य केले गेले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पोलिस या भागात ऑपरेशन राबवित होते. या कारवाईत पाच माओवादी आणि एक सुरक्षा कर्मचारी मारले गेले. ऑपरेशननंतर सुरक्षा कर्मचारी बेस कॅम्पकडे परत येत होते. त्यावेळी एका वाहनाला आयईडीने उडवून देण्यात आले. स्फोटाच्या जागेची तपासणी केल्यानंतर आम्ही तपशीलवार माहिती जाहीर करू.

स्फोट इतका भीषण होता की स्कॉर्पिओच्या बोनेटचा एक भाग जवळच्या झाडावर लटकला होता. स्फोटासाठी माओवाद्यांनी स्फोटासाठी ‘फॉक्सहोल’ तंत्राचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तंत्रात माओवादी खड्डे खणतात. हे खड्डे दगडांनी भरतात. असे खड्डे ऑपरेशन्सदरम्यान सापडत नाहीत. जेव्हा माओवाद्यांचा स्फोट घडवायचा असतो तेव्हा ते या खड्ड्यांमध्ये स्फोटकं ठेवून देतात. त्यानंतर स्फोट घडवून आणतात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!