
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आश्रय देण्यामागे काँग्रेसचा हाथ असल्याचा आरोप डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या वादग्रस्त पत्रकार प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर हिंसाचारातील आरोपींवर जसे बुलडोझर चालवले गेले, तसेच कोरटकरच्या घरावरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

अटकेनंतर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले की, ‘आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकरला मंचरियाल (तेलंगणा) येथील काँग्रेस नेता विजय अंकलम यानेच लपवून ठेवले होते. ही बाब अत्यंत संतापजनक असल्याने, काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.”
Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला
शिवद्रोहाचा आरोप
विशेष म्हणजे, ज्या राज्यात कोरटकर लपून बसला होता, तिथे काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परिणय फुके यांनी सांगितले की, ‘शिवद्रोही प्रशांत कोरटकरला वाचविणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कडक कारवाई होईल आणि लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल.’ असे ते म्हणाले.
प्रशांत कोरटकरविरोधात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता. कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता, त्यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता होती. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आणि शिवप्रेमींनी त्याच्या अटकेची मागणी केली होती. अखेर, कोल्हापूर पोलिसांनी 24 फेब्रुवारी रोजी तेलंगणामध्ये जाऊन कोरटकरला अटक केली आहे.
Prashant Koratkar : शिवरायांचा अवमान करणारा पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिस गेल्या 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते, मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने त्याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल’, असे ते बोलले होते. प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर आता पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरटकरला कोल्हापुरात आणल्या गेले आहे. समाजात इतिहासाचा अपमान करणाऱ्यांना योग्य शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे.