महाराष्ट्र

Parinay Fuke : राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःला तपासावे

Maharashtra : हिंदुत्वावर प्रवचन देणाऱ्या ठाकरेंवर डॉ. फुके यांचा प्रहार

Post View : 96

Author

भाजप नेते माजी मंत्री आमदार परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल करत, हिंदुत्वावर बोलण्याआधी त्यांच्या भूमिकेचा हिशोब द्यावा, असा घणाघात केला. सौगात-ए-मोदी किटवरून राजकारण करणाऱ्यांनी देशविरोधी निर्णयांवर गप्प का बसले, असे सवाल परिणय फुके यांनी उपस्थित केले.

सौगात-ए-मोदी किटवरून राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला थेट सवाल करत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यांनी तीन थेट प्रश्न उपस्थित करत, हिंदुत्वावर भाष्य करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी उत्तरं द्यावी, असे डॉ. परिणय फुके यांनी आपल्या एक्स हॅण्डल वर ट्वीट केली आहे.

डॉ. परिणय फुके यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, अनेक लोकं सौगात – ए – मोदी किट वरून राजकारण करत आहेत. असे राजकारण करणाऱ्यांना आणि त्यातही उद्धव ठाकरेंना माझे तीन प्रश्न आहेत. देशविरोधी विखाराचे टूलकिट वापरणाऱ्यांबद्दल तुम्ही गप्प का? उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या मान्य करताना तुम्ही गप्प का होते? वक्फ बोर्डाच्या सुधारित बिलाविरुद्ध तुमचे नेते मतदान करतात तेव्हा तुमचं हिंदुत्त्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंनी आधी या प्रश्नांची उत्तरे द्यावी. त्यानंतरच त्यांनी हिंदुत्वावर भाष्य करावे, असे डॉ. फुके म्हणाले आहेत.

Parinay Fuke : धरणीचे हसू परत येणार

परखड भूमिका

आमदार डॉ. परिणय फुके हे केवळ टीका करणारे आमदार नसून, ते आपल्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. यंदाच्या अधिवेशनात त्यांनी शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, यासाठी त्यांनी विधानसभेत जोरदार भुमिका मांडली. डॉ. परिणय फुके यांनी ग्रामीण भागात रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज वितरण सुधारण्यासाठी सरकारला ठोस उपाययोजना करण्यास मागणी केली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत.

Parinay Fuke : मासेमारीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज

सौगात – ए – मोदी म्हणजे काय?

‘सौगात-ए-मोदी’ ही केंद्र सरकारने देशभरातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची मोफत किट दिली जाते. या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, साखर, मीठ आदी वस्तूंचा समावेश आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करणे आणि त्यांच्या अन्नसुरक्षेची हमी देणे हा आहे. केंद्र सरकारच्या या योजनेवरून काही विरोधकांनी टीका केली असली, तरी परिणय फुके यांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे राजकारण करणे योग्य नाही. गरिबांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या कोणत्याही योजनेला विरोध करणे हे राजकारणापलीकडील असंवेदनशीलतेचे लक्षण आहे.

डॉ. परिणय फुके यांच्या सवालांमुळे ठाकरे गट आणि इतर विरोधक काय उत्तरं देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या पक्षांनी त्यांच्या भूमिकेतील विसंगतींवर उत्तरं द्यावीत, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

Parinay Fuke : महामार्गासाठी गुजरातसारखा मॉडेल महाराष्ट्रात लागू होणार?

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!