भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये जोश, ऊर्जा, जुनून भरणारे नाव म्हणजे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके. फुके यांच्या प्रयत्नांमुळेच आता भंडाऱ्यात भाजपचे कमळ पूर्णपणे उमलले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी हिशोब चुकता केला आहे. माजी खासदाराला पुन्हा तिकडून इकडे आणत फुके यांनी मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्ह तर भाजपकडे हे दाखवून दिले आहे. फुके यांनी फिरविलेल्या या जादूच्या काडीमुळे महाविकास आघाडीही फुटली सगळीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांना भाजपने मोठी जबाबदारी भंडाऱ्यात सोपविली होती. या जबाबदारीला फुके यांनी तितक्याच सक्षमपणे पेलले आहे.
भंडारा-गोंदियाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी सर्वत्र कमळ फुलविले आहे. जिल्ह्यात भाजपला वाढविण्यासाठी फुके यांनी सुरू केलेले प्रयत्न फळाला आले आहेत. ‘तुतारी’धारी माजी खासदार मधुकर कुकडे पुन्हा एकदा भाजपवासी झाले आहेत. नागपूर जिल्हाच्या काटोल येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फूकें यांच्या नेतृत्वात कुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
OBC फॅक्टरचे बळ
मधुकर कुकडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे ओबीसी समाजाचे मोठे पाठबळ भाजपला मिळणार आहे. 17 नोव्हेबरला काटोल येथे कुकडे यांच्या पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला. अचानक मधुकर कुकडे भाजपच्या व्यासपीठावर पहायला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते इकडून तिकडे धावू लागले. कुकडे यांना व्यासपीठावर बघून अनेकांना मोठा धक्का बसला. कुकडे कशासाठी आले, असा प्रश्न सगळ्यांना पडला. अखेर कुकडे यांनी भाजपचा दुपट्टा खांद्यावर घेतल्यानंतर फुके यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि भंडारा-गोंदियात पुन्हा कमळ फुलले.
कुकडे यांच्या पक्ष प्रवेशाने तीनही विधानसभा क्षेत्रात मोठा फरक पडणार यात शंकाच नाही. पक्ष श्रेष्ठीनी फूकेंना भंडारा-गोंदियात भाजपची कमान फुके यांच्याकडे सोपवून कोणताही चूक केलेली दिसत नाही. भाजपला मोठे करण्यात डॉ. फुके निर्णयाक भूमिका निभावत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी माजी खासदार शिशूपाल पटले यांना Congress मध्ये नेते होते. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीला मजबूत केले होते. आता डॉ. फुके यांनी कुकडे यांना भाजपमध्ये आणत नानांना ‘इट का जवाब पत्थर से’ दिला आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे.
समाजासाठी Hard Work
ओबीसी समाजासाठी परिणय फुके यांनी खरंच मोठे योगदान दिले आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या नेत्यांसह फुके यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात यशस्वी तोडगा काढला तो डॉ. फुके यांनीच. त्यामुळेच ओबीसींचे वसतिगृह, शिष्यवृत्ती, नॉन क्रिमिलेअर असे प्रश्न सुटले. गोंड-गोवारी समाज निवडणुकीवर बहिष्कार घालणार होता. या समाजाचे एका रात्रीतून मतपरिवर्तन घडवून आणले ते डॉ. परिणय फुके यांनीच. त्यामुळेच सध्या भाजपमध्ये त्याची प्रतिमा ‘ना कोणासमोर वाके, न झुके; काम फत्ते करायचे असेल तर नाव घ्या फक्त परिणय फुके’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.