महाराष्ट्र

Parinay Fuke : नितीन गडकरी म्हणजे ‘सिंबॉल ऑफ कनेक्टिव्हिटी’

East Vidarbha : विकासाच्या गंगेत भिजला भंडारा

Author

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले. ज्यामुळे पूर्व विदर्भातील रस्ते आणि पायाभूत सुविधा आधुनिक बनणार आहेत.

विचार स्पष्ट आणि संकल्प प्रखर असतील, तर विकास केवळ भाषणात राहत नाही. तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरतो, असे चित्र भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य लोकार्पण सोहळ्यात दिसून आले. केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलै 2025 रोजी भंडाऱ्यात तब्बल 1 हजार 100 कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण पार पडले.  या महामार्गांच्या उद्घाटनात पूर्व विदर्भातील विकासाचा स्पष्ट झोत पाहायला मिळाला. विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना नवे बायपास, अधिक रुंद रस्ते आणि अपघात टाळणारे प्रकल्प यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

भव्य सोहळ्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केंद्रीय मंत्री गडकरींच्या कामाची आणि दूरदृष्टीची भरभरून स्तुती केली. गडकरी साहेबांना काही सांगायची देखील गरज नाही. मागण्याआधीच प्रकल्पांना मंजुरी मिळते, असं सांगताना त्यांच्या आवाजात असलेला आदर आणि विश्वास स्पष्ट दिसत होता. डॉ.  फुके म्हणाले,  84 कोटींच्या मौदा बायपास प्रकल्पात परमात्मा एक सेवक आश्रम जवळ अनेक अपघात होत होते. त्या ठिकाणी फ्लायओव्हरची मागणी आम्ही केली आणि लगेचच नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. हे पाहून वाटतं की, गडकरी हे केवळ नेता नाहीत, तर ते हजारो सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षांचे आधार आहेत.

Nitin Gadkari : पावसात बुडणाऱ्या पुलापासून ते सहा लेनच्या सडकेपर्यंत

कृषिमंत्री पदाची इच्छा

सिंबॉल ऑफ युनिटी म्हणून ज्या प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांना देश ओळखतो. त्याचप्रमाणे नितीन गडकरी हे ‘सिंबॉल ऑफ कनेक्टिव्हिटी’ आहेत, असा गौरव डॉ. फुके यांनी यावेळी व्यक्त केला. सरदार पटेल यांनी देशाची राज्यं जोडली, तर गडकरी साहेबांनी गाव ते शहर जोडणाऱ्या रस्त्यांच्या माध्यमातून देश जोडला, असं ते म्हणाले. तुमसर, वरठी, भंडारा शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी केलेल्या उपाययोजनांबद्दल देखील डॉ. फुके यांनी विशेष उल्लेख केला. बायपास, सर्व्हिस रोड सुधारणा आणि रुंदीकरण यामुळं या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भविष्यात नितीन गडकरी कृषीमंत्री व्हावे, अशी जोरदार इच्छा डॉ. फुके यांनी व्यक्त केली. जर नितीन गडकरी कृषीमंत्री झाले, तर शेतकऱ्यांचे जीवन बदलून जाईल. देश अमेरिका पेक्षाही पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी ठामपणे मांडला. त्यांच्या मते, आधुनिक शेती, सिंचन आणि ग्रामीण रस्त्यांच्या माध्यमातून नितीन गडकरी शेती क्षेत्रात क्रांती घडवू शकतात. मी लहानपणापासून नितीन गडकरी यांच्या संपर्कात आहे. त्यांचे नेतृत्व, त्यांची कार्यशैली आणि देशहितासाठीची त्यांची बांधिलकी पाहत आलो आहे. त्यांच्या मार्गदर्शनात काम करणं म्हणजे माझ्यासाठी भाग्य आहे, असं वक्तव्य डॉ. फुके यांनी केले. या कार्यक्रमातून फक्त रस्त्यांचं लोकार्पण झालं नाही, तर नितीन गडकरी यांचं नेतृत्त्व आणि त्यांच्या कामगिरीविषयी असलेली प्रचंड लोकभावना देखील उघड झाली.

Randhir Sawarkar : मराठीसाठी नाही, मतांसाठी युती

डॉ. परिणय फुके यांनी गडकरी यांच्या विषयीचा आदर व्यक्त करताना केवळ प्रशंसा केली नाही, तर एका पिढीने आपल्या आदर्श नेत्याकडे कसं पाहावं याचं उत्तम उदाहरण सुद्धा सादर केलं.

Randhir Sawarkar : मराठीसाठी नाही, मतांसाठी युती

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!