महाराष्ट्र

Parinay Fuke : स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी आमदार पोहोचले देवाभाऊंच्या दारी

East Vidarbha : भंडारा-गोंदियात जलशुद्धीकरणाची लाट

Post View : 18

Author

पूर्व विदर्भातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारातून गती मिळाली आहे. तलाव आणि धरणांचे शास्त्रीय पुनरुज्जीवन सुरू झाले आहे.

पूर्व विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि तलावांच्या नवजीवनाचा संकल्प घेणारी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना आता केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरली आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेत ही योजना आता नवा चेहरा घेऊन शिवारात पोहोचत आहे. तलावांचे शुद्धीकरण, गाळ काढून शेतीसाठी पूरक खताची निर्मिती, आणि जलसाठवण क्षमता वाढवण्याचा त्रिसूत्री उद्देश या योजनेतून साध्य होत आहे. डॉ. फुके यांनी या योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

तलावांमधील गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले आहे. ही योजना केवळ जलव्यवस्थापनापुरती मर्यादित नाही. तर शेतीला समृद्ध करणारा आणि रोजगारनिर्मितीचा नवा मार्गही ठरणार आहे. सध्या पावसाळा हा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. पावसाळा सुरू होताच दूषित पाण्यामुळे साथीचे आजार डोके वर काढतात. अशा वेळी जनतेला सुरक्षित आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी डॉ. परिणय फुके यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेला पोषक गाळ शिवारात पोहोचवणे आणि धरणांतील पाणी पिण्यायोग्य राहावे, यासाठी त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आहे.

Sanjay Rathod : ‘ऑपरेशन प्रस्थान’ने मुली झेपावतील स्वसंरक्षणाच्या आकाशात

समस्या ते संकल्प

प्रयत्नांच्या अनुषंगाने डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेविका परिणीता फुके देखील उपस्थित होत्या. स्थानिक स्तरावरून राज्यस्तरापर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेबाबत सविस्तर चर्चा झाली. डॉ. फुके यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील टप्प्यात अधिक प्रभावी कामासाठी मार्गदर्शन दिले.

जिल्ह्यांतील बहुतांश शेतकरी हे मासेमारी व शेतीवर अवलंबून आहेत. मात्र तलावांतील साचलेल्या गाळामुळे शेती व जलसाठवणीत अडथळे येत होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी डॉ. फुके यांनी गाळ पुनर्वापराचे शास्त्रीय नियोजन सुचवले आहे. भंडारा-गोंदिया परिसरातील तब्बल 4 हजार 400 तलाव आणि दहा प्रमुख धरणांमधून दरवर्षी लाखो घनमीटर गाळ काढण्याचा संकल्प डॉ. फुके यांनी हाती घेतला आहे. या गाळाचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करून, ते शेतीसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने वापरण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

Shiv Sena Nagpur : रुग्ण सेवेसाठी समीर शिंदे सरसावले

योजनेअंतर्गत तलावांचे खोलीकरण, गाळ व्यवस्थापन आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विज्ञानाधिष्ठित आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. परिणामी, जलसाठवण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, जलटंचाईचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार आहे. ही योजना केवळ तलावांचे रूप बदलणार नाही, तर शेतकऱ्यांचे भविष्यही उजळवणार आहे, असा डॉ. फुके यांचा विश्वास आहे.

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!