महाराष्ट्र

Parinay Fuke : जपानसारख्या विकासासाठी होणार प्रयत्न

Devendra Fadnavis : परदेशात केलेला अभ्यास राज्याच्या मातीत उतरणार

Share:

Author

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपान दौऱ्यातील तंत्रज्ञान, शिस्त आणि बुलेट ट्रेनचा अनुभव मुख्यमंत्र्यांशी शेअर केला.

आपल्या अभ्यास दौऱ्यातून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपानमध्ये टिपलेले बारकावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर केले. दोन नेत्यांच्या या संवादातून राज्याच्या मातीत जपानसारखा विकास होण्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी बारकाईनं अभ्यास केला. जपानचं तंत्रज्ञान जाणून घेतलं. विकासाची प्रक्रिया माहिती करून घेतली. यातील प्रत्येक बाबीवर त्यांनी देवाभाऊंसोबत चर्चा केली.

जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी अनेक स्थानिक अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. महाराष्ट्रासाठी त्यातून काय घेता येईल, यावर विचारमंथन केलं. जपानमधूनन परत येताच क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली निरीक्षणं मांडली. डॉ. फुके यांनी जपानमध्ये तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती घेतली. जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचा देखील अभ्यास केला. शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा प्रवास, जपानच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांची कार्यपद्धती, तसेच रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रातील नवकल्पना याचा त्यांनी अनुभव घेतला.

Parinay Fuke : स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी आमदार पोहोचले देवाभाऊंच्या दारी

महाराष्ट्रात तंत्रज्ञान विकास

महाराष्ट्रासाठी त्यांनी या तंत्रज्ञानाचा आणि शिस्तीचा उपयोग कसा करता येईल, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विचारमंथन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी जपानमधील तंत्रज्ञान आणि विकास महाराष्ट्रात कसा आणता येईल, यावर खोलवर विचारविनिमय करण्यात आला. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही असतात. नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ते करीत अससेले काम सर्वश्रूत आहे. आता त्यांना डॉ. फुके यांचीही साथ मिळणार आहे.

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत तेव्हा त्यांनी ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ प्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरचा कायापालट केला. मेट्रो प्रकल्प झपाट्यानं साकारला. रस्त्यांचा नवा आराखडा राबविला गेला. उड्डाणपुलांची मालिका तयार झाली. आता या विकासाच्या घोडदौडीमध्ये डॉ. परिणय फुके देखील सामील झाल्याचं दिसत आहे.

डॉ. फुके म्हणतात की, जपानची शिंकान्सेन बुलेट ट्रेन ही फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर एक पूर्ण जीवनशैलीचा अनुभव आहे. 513 किलोमीटरचा प्रवास 2 तास 15 मिनिटांत पूर्ण झाला. हा प्रवास गतीमान होता. आरामदायक आसन, व्यवस्था होती. वेळेचे काटेकोर पालन होत होते. जपानमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था हाच यशाचा मुख्य पाया आहे. भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा प्रकल्प भारताच्या रेल्वे व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. डॉ. फुके यांच्या मते, या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवा वेग मिळणार आहे. महाराष्ट्रासाठीही या तंत्रज्ञानाचा समर्पक वापर केल्यास महानगरांच्या विकासाला गती मिळेल.

Parinay Fuke : भारताच्या बुलेट ट्रेनची स्पीड होणार सुसाट

स्मार्ट सिटीचा आदर्श

डॉ. फुके यांच्या या पुढाकारानं आता नागपुरातून सुरू झालेली विकासाची गंगा अधिक वेगानं भंडारा, गोंदियापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. जपानमधील तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रासह आपल्या भागात कसा वापर करता येईल, यासाठी डॉ. फुके भविष्यात नक्कीच प्रयत्न करताना दिसण्याचे हे संकेत आहेत. डॉ. फुके यांचे या दिशेने नवे प्रयोग लवकरच दिसतील असे यावरून वाटते. नागपूरमध्ये मेट्रो, उड्डाणपूल, आणि रस्त्यांच्या नव्या स्वरूपामुळे शहराची ओळखच बदलली आहे. आता या विकास प्रक्रियेत डॉ. फुके यांनीही सक्रिय भूमिका घेतल्याचं दिसत आहे. जपानच्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा अॅक्शन प्लॅनवर फडणवीस आणि फुके यांनी एकमत व्यक्त केलं. यावर लवकरच कामही सुरू होऊ शकते. भविष्यात काही योजना आकारास येऊ शकतात.

डॉ. फुके यांनी जपानमधील रोबोटिक्स, एआय-आधारित सुरक्षा प्रणाली आणि स्मार्ट विमानतळ यांसारख्या नवकल्पनांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जपानमधील हे तंत्रज्ञान भारतीय स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी आदर्श ठरू शकते. जपानच्या शिस्तबद्धतेची आणि तंत्रज्ञानाची संगम भारताच्या विकासासाठी नवीन आदर्श निर्माण करेल.

Parinay Fuke : दादांनी मिळवून दिले हक्काचे 20 टक्के

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!