महाराष्ट्र

Parinay Fuke : भारताच्या बुलेट ट्रेनची स्पीड होणार सुसाट

Japan Tour : माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा विश्वास

Author

माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकताच जपान दौरा केला. भारतामध्ये बुलेट ट्रेनचे काम सुरू असून लवकरच बुलेट ट्रेन ही सुसाट वेगाने धावेल आणि प्रगतीचे नवे शिखर गाठेल असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला.

जपान हे केवळ तंत्रज्ञानातच नव्हे तर शिस्तबद्धतेत, सफाईपणात आणि प्रगत वाहतूक व्यवस्थांमध्ये जागतिक आदर्श मानले जाते. अलीकडेच माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या जपान दौऱ्यादरम्यान अशाच एका विश्वविख्यात व्यवस्थेचा ‘शिंकान्सेन’ अर्थात बुलेट ट्रेनचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. क्योटो ते टोकियो असा जवळपास 513 किलोमीटरचा प्रवास त्यांनी अवघ्या 2 तास 15 मिनिटांत पूर्ण केला. ही सेवा केवळ जलदच नव्हे, तर अत्यंत आरामदायक आणि सौंदर्यपूर्ण देखील होती. प्रवासादरम्यान खिडकीबाहेर दिसणारे निसर्गदृश्य, आतली स्वच्छता, गादीसारखी मऊ आसने आणि अत्यंत वेळेचे काटेकोर पालन हे सगळं एकत्रितपणे शिंकान्सेनच्या यशाचं गमक ठरतं.

डॉ. फुके यांनी या अनुभवातून केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर एक संपूर्ण जीवनशैलीच आत्मसात केली. ट्रेनच्या प्रत्येक स्थानकावर अचूक वेळेवर पोहोचणं, कोणतीही गैरसोय न होणं, आणि प्रवासादरम्यान थकवा जाणवू न देणं हे सर्व केवळ यंत्रांच्या आधारे नव्हे, तर माणसांच्या शिस्तबद्धतेमुळे शक्य झालं आहे, असं ते म्हणाले. भारतही सध्या अशाच एका ऐतिहासिक पायाभरणीच्या टप्प्यावर आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पुढे सरकत असून, हे भारतातील वाहतूक व्यवस्थेतील आमूलाग्र परिवर्तन असणार आहे. जपानने ज्या प्रकारे वाहतूक व्यवस्थेला प्रगतीचं साधन केलं आहे. त्याच पद्धतीने भारतातसुद्धा हायस्पीड रेल्वे सेवा देशाच्या विकासाला नवे वळण देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

IPS Transfer : सीएमच्या गावात डंका गाजविणारे चांडक सांभाळणार अकोला

आत्मविश्वासाची नवीन झेप

जपानच्या टेक्नॉलॉजीचा अनुभव घेताना डॉ. फुके यांना भारताच्या भविष्यातील चित्राची झलकही दिसली. आपला देश आता हायस्पीड रेल्वेच्या रुळांवर धावत आहे. मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, नवनवीन राष्ट्रीय महामार्ग ही सगळी उदाहरणं दाखवतात की भारत देखील गतीने पुढे जात आहे, असं त्यांनी नमूद केलं. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम गुजरात आणि महाराष्ट्रात प्रगत अवस्थेत आहे. त्यासाठी जपानची आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळत आहे. यामध्ये शिंकान्सेनच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे जपानी शिस्त आणि भारतीय क्षमता यांचा संगम एक नवा आदर्श निर्माण करू शकतो.

डॉ. फुके म्हणतात, भारत केवळ बुलेट ट्रेन सुरू करतोय असं नाही, तर तो एक नवा आत्मविश्वासही गाठतोय. आपल्याकडे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने अवलंब केला जातोय, आणि पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक गुंतवणूक होते आहे. त्यांच्या मते, जेव्हा शिंकान्सेनसारखी सेवा भारतात सुरू होईल, तेव्हा ती केवळ प्रवासाला नव्हे, तर सामान्य माणसाच्या जीवनशैलीलाही वेग देईल. रोजगार निर्मितीपासून ते शहरी विकासापर्यंत अनेक क्षेत्रांत त्याचा सकारात्मक परिणाम जाणवेल.

Narendra Modi : सौगंध मुझे इस मिट्टी की, देश मिटने नहीं दूंगा, झुकने नहीं दूंगा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!