
गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गोंदिया जिल्ह्यात लवकरच वीज उपकेंद्राचे नवीनीकरण होणार आहे.
पूर्व विदर्भात विकासाचे वादळ निर्माण झाले आहेत. भंडारा व गोंदिया या दोन महत्वाच्या जिल्ह्यांनी विकासाच्या शर्यतीत भरारी घेतली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शेतकऱ्यांसाठी रस्त्यांचे नवीनीकरण, रेल्वे प्रकल्पांचे सुधारणेसोबतच ओबीसी समाजाला न्याय आणि तलावांचे गाळमुक्तीकरण हे सगळे केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलात येत आहेत. या बदलांच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. त्यांनी या प्रकल्पांसाठी केवळ मागण्या केल्या नाहीत. तर प्रत्येक कामासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून मोठे यश मिळवले आहे.
डॉ. फुके यांच्या प्रयत्नांचा एक नवा अध्याय म्हणजे देवरी येथे उभारण्यात येणार आहे. 132 केव्हीचे वीज उपकेंद्र जे दीर्घ काळ प्रलंबित होते, आता प्रत्यक्षात ते उतरणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी व चिचगड या भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा हा कायमचा डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे घरगुती वापर, शेतीसाठी सिंचन पाणी आणि लघुउद्योग यांच्यावरही याचा प्रतिकूल परिणाम होत होता. अनेकदा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वेळेवर भरल्या जात नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल सुरूच होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Nagpur : विदर्भाचे प्रशासन नावानेच नाही, कामगिरीनेही टॉप क्लास
सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश
डॉ. फुके यांनी ऊर्जाविभागाच्या अधिकाऱ्यांपुढे परिस्थिती मांडली. नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. हे उपकेंद्र उभारल्याने देवरी व चिचगड भागातील वीजदाबाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला आहे. शेतीसाठी आवश्यक सिंचन वेळेवर उपलब्ध होईल, लघुउद्योगांना स्थिर वीज मिळेल आणि घरगुती गरजा वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे या भागातील आर्थिक व सामाजिक विकासालाही नवे गतीमान स्वरूप मिळणार आहे.
गोंदिया भागातील अनेक गावांमध्ये वीज ताणतणावाच्या समस्येमुळे वर्षानुवर्षे विकासाचा वेग खुंटला होता. मात्र डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने हे उपकेंद्र प्रत्यक्षात आल्यावर, संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाले आहे. ऊर्जेच्या या नव्या पर्वाचा पाया घालणारे डॉ. परिणय फुके हे केवळ मागण्या करणारे नेते नाहीत, तर त्या मागण्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देवरी-चिचगड भागातील जनतेसाठी सातत्याने पाठपुरावा करत ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी भर घातली आहे. हे उपकेंद्र केवळ वीज पुरवठा पुरवणार नाही, तर एक नवा विश्वास, नवी दिशा आणि नव्या संधींचे दारही उघडेल.
Operation Sindoor : शिवसेनेच्या जयघोषांनी झळकलं अकोल्यात देशभक्तीचं रूप