भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ निराकरणासाठी भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढे सरसावले.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच बोलके नेते पाहायला मिळतात, पण त्यापैकी किती जण खरोखर जनतेच्या हृदयात स्थान मिळवतात? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत असतो. सत्तेच्या खुर्चीवर बसून अनेक नेते जनहिताचे प्रश्न विसरतात, पण भंडाऱ्याचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी याला अपवाद ठरत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. 18 सप्टेंबर 2025 रोजी भंडारा येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात त्यांनी पुन्हा एकदा आपली लोकसेवेची बांधिलकी दाखवून दिली.
उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या. डॉ. फुके यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या जनता दरबारात भंडाऱ्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभाराबाबतच्या तक्रारी मांडल्या. डॉ. फुके यांनी केवळ ऐकूनच थांबले नाही, तर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांचा हा उत्साह आणि कार्यतत्परता पाहून नागरिकांना विश्वास वाटला की त्यांच्या समस्या खरोखरच सोडवल्या जातील.
Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांच्या स्थगितीवर हायकोर्टाचा सवाल
अधिकाऱ्यांना कठोर दम
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका निवडणूक न झाल्याने अनेक भागांमध्ये नगरसेवक किंवा कार्यकारी अधिकारी नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत डॉ. फुके यांनी स्वतः पुढाकार घेत जनतेच्या समस्यांना हाक दिली आणि त्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा केला. डॉ. परिणय फुके यांचा हा जनता दरबार केवळ औपचारिकता नव्हता, तर त्यांच्या लोकाभिमुख कारभाराचा एक ठळक नमुना होता. प्रत्येक नागरिकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधताना त्यांनी दाखवलेली आपुलकी आणि समस्यांबाबतची गंभीरता उपस्थितांना भावली. काही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी कामात टाळाटाळ केल्याने त्यांना फोनवरून चांगलेच खडसावले.
काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे आणि जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष चालणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. डॉ. फुके यांनी केवळ समस्यांचे निराकरणच केले नाही, तर नागरिकांना भविष्यातही अशाच प्रकारे प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे भंडाऱ्यातील जनता दरबार हा केवळ एक कार्यक्रम न राहता, लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सोडवण्याचा एक मंच बनला. स्थानिक पातळीवरील प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी डॉ. फुके यांचे हे प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरत आहेत. भविष्यातही असेच जनता दरबार आयोजित करून ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
Kiran Sarnaik : रस्ता ओलांडताना संकट; आमदाराच्या गाडीने तरुण कोमात
