
जिथे भेल प्रकल्पाची वाट थांबली, तिथे आता विकासाची नवी दिशा ठरत आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने साकोली औद्योगिक क्षेत्रात नवउद्योगांची आशा निर्माण झाली आहे.
प्रगतीची जिथे गाडी अडकते, तिथे नवा रस्ता काढण्याची जिद्द ठेवणारे नेते म्हणजे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राची ठळक नोंद व्हावी, यासाठी आमदार डॉ. परिणय फुके सतत प्रयत्नशील आहेत. फुके यांनी पुन्हा एकदा दूरदृष्टीपूर्ण आणि निर्णायक पावले उचलली आहेत. 2013 मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाला साकोली औद्योगिक क्षेत्रात जमीन वाटप करण्यात आली होती. मात्र तब्बल दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरूवात झाली नाही. परिणामी, या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या संधी हुकल्या.
हिच संधी आता नवी दिशा देण्यासाठी परिणय फुके यांनी उचललेली पावले भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक पुनर्जन्माची नांदी ठरत आहेत. 8 मे रोजी त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, भेल प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीचा पुनर्विचार करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. भेलने स्थगन आदेश घेतलेला असतानाही, पर्यायी भूमी मराठवाड्यात देऊन भंडाऱ्यातील जमीन अन्य प्रकल्पासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करण्याचा ठोस विचार पुढे आला.

प्रगतीसाठी कटिबद्ध
बैठकीत न्यायालयीन प्रक्रियेवरही चर्चा झाली. या प्रक्रियेचा योग्य मार्ग शोधत भंडाऱ्यातील साकोली औद्योगिक क्षेत्रात “नवीन अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्प” सुरू करण्याचा विचार परिणय फुके यांनी गंभीरपणे पुढे आणला आहे. परिणय फुके यांनी या संदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडत विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. केवळ पक्षासाठी नव्हे, तर जिल्ह्याच्या भल्यासाठी निर्णय घेणे हेच माझे ध्येय,” असे ठाम विधान करत परिणय फुके यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Chandrashekhar Bawankule : नागपूर होणार महाराष्ट्राचा नवा शासकीय गड
या बैठकीत जे निर्णय झाले, ते भविष्यात साकोलीसह भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशात क्रांतिकारी बदल घडवतील, यात शंका नाही. जिल्ह्याच्या विकासात आपले संपूर्ण योगदान देण्याची तयारी दर्शवणारे डॉ. फुके हे भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीच्या यशस्वी प्रवासात महत्त्वाचे चालक ठरत आहेत.
भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि तरुणांना संधी मिळावी, यासाठी परिणय फुके सातत्याने भगीरथ प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे साकोली औद्योगिक क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आता अधिक बळावली आहे. उद्योगचाच नव्हे, तर रोजगार, उत्पादन आणि प्रगतीचा नवा केंद्रबिंदू बनण्याची तयारी आता साकोली करत आहे. याचे श्रेय निःसंशयपणे परिणय फुके यांच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल.