महाराष्ट्र

Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार

Gondia Bank Battle : विरोधकांना चीत करून महायुतीचा भगवा फडकला

Share:

Author

पूर्व विदर्भात भाजपचा गड राखून ठेवणारे आणि महायुतीच्या विजयासाठी कधीही माघार न घेणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा महायुतीचा विजय साकारून आपले सत्तेचे वर्चस्व दृढपणे राखले आहे.

पूर्व विदर्भाच्या राजकारणात आपले वर्चस्व अजोड राखणारे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. या विजयाचे प्रमुख शिल्पकार म्हणजे डॉ. परिणय फुके. केवळ दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील दूध संघ निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी विजय खेचून आणला आणि आता गोंदिया जिल्ह्यातही त्यांनी आपली ‘राजकीय बुद्धिबळाची चाल’ अचूक साधली आहे. डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या रणनीतीने पुन्हा एकदा स्थानिक सहकार क्षेत्रात भगवा फडकवला आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 11 जागा जिंकल्या.

महाविकास आघाडी आणि सेवा सहकारी परिवर्तन पॅनलने 9 जागांवर कब्जा केला. हा सामना थेट वर्चस्वासाठी होता. या लढतीत डॉ. परिणय फुके यांची रणनीती निर्णायक ठरली. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बनसोड, उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, राजू एन. जैन आणि गजानन परशुरामकर यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात डॉ. परिणय फुके यांची ओळख ही केवळ वक्तृत्व आणि जनसंपर्कापुरती मर्यादित नाही. तर त्यांची रणनीती आणि व्यवस्थापन कौशल्य हे देखील त्यांच्या यशाचे गुपित आहे. भंडाऱ्यात दूध संघ जिंकून ते थांबले नाहीत. लगेच गोंदियात सहकार क्षेत्रातही त्यांनी भाजप आणि महायुतीसाठी विजय खेचून आणला. हा विजय केवळ मतदानाचा नव्हता. तर त्यांनी उभारलेल्या संघटनात्मक बांधणीचा आणि प्रचंड जनाधाराचा परिणाम होता.

Parinay Fuke : भाषा प्रेमाचा ड्रामा, पण ग्लासात मात्र इंग्रजीच

असा आहे निकालाचा आकडा

सेवा सहकारी गटातून आमगाव येथून भेरसिंग नागपुरे (महायुती), देवरीतून प्रमोद संगीडवार (महायुती), सालेकसातून बंटी कटरे (महाविकास आघाडी) विजयी झाले. तसेच गोंदियातून केतन तूरकर (महायुती), सड़क अर्जुनीतून गंगाधर परशुरामकर (महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल), गोरेगावातून दुर्गाप्रसाद ठाकरे (महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल), तर तिरोडा येथून आमदार विजय रहांगडाले (महायुती) विजयी ठरले. औद्योगिक गटातून अरुण दुबे (महाविकास आघाडी), मोरगाव अर्जुनीतून केवलराम पुस्तोडे (महायुती), दूध संघ गटातून पंकज यादव (महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल), मजूर संघ गटातून विजयसिंह राठोड (महाविकास आघाडी), जंगल कामगार गटातून अशोक गप्पू गुप्ता (महाविकास आघाडी) आणि मच्छीमार संघ गटातून अजय हलमारे (महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल) यांनी विजय मिळवला.

ओबीसी गटातून डॉ. अविनाश जायसवाल, महिला गटातून रचना गहाणे व प्रिया हरिणखेडे, अनुसूचित जाती जमाती गटातून आमदार राजकुमार बडोले, व्हीजेएनटी गटातून विनोद कन्नमवार (महायुती) यांची निवड झाली. पगारदार गटातून राजेंद्र जैन (महायुती) आणि वैयक्तिक मतदार गटातून प्रफुल्ल अग्रवाल (महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल) हे दोघे निर्विरोध निवडून आले.या निकालामुळे बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा राजेंद्र जैन यांचे नाव आघाडीवर आले असून महायुतीचा मजबूत दावा स्पष्टपणे दिसून येतो आहे.एकीकडे महाविकास आघाडीने देखील आपली ताकद दाखवत 9 जागा जिंकून लढत रंजक केली. तरीही डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीने बँकेवर आपला मजबूत प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या रणनीती, वक्तृत्व आणि लोकांशी असलेला थेट संपर्क हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य आहे.

Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!