महाराष्ट्र

Parinay Fuke : साकोलीत भाजपचे संघटन नव्या उंचीवर

BJP : पंतप्रधानांच्या अकरा वर्षाच्या नेतृत्वाखाली पक्षाचा दबदबा वाढला

Post View : 48

Author

भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात उत्साहाचा पुर उसळला आहे. अनेक शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी भाजप नेते, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे.

देशाच्या राजकारणात सलग तीन टर्म पूर्ण करणारा, आपली विकासाची वाटचाल अबाधित राखणारा आणि जनतेचा विश्वास पुन्हा पुन्हा जिंकणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष (भाजप). अलीकडेच भाजपने आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा देशासमोर मांडला आणि हे स्पष्ट केलं की, पक्षाचं नेतृत्व, नियोजन आणि कार्यशैली ही देशासाठी परिवर्तन घडवणारी ठरली आहे. सत्तेत सलग तीनदा स्थान टिकवणं ही बाब स्वतःतच ऐतिहासिक आहे. हीच भाजपची ताकद सिद्ध करते. राजकारणात एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असते, ती म्हणजे नेतृत्वाची दूरदृष्टी.

हीच दूरदृष्टी जेव्हा संघटनाला लाभते, तेव्हा पक्ष उभारी घेतो, नवे वळण घेतो आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर असे नेतृत्व म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात, त्यांना सन्मानाने एकत्र ठेवण्यात आणि पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्यात त्यांनी आपला खास ठसा उमटवला आहे. शनिवारी, (14 जून) रोजी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली.

Parinay Fuke : आमदारांनी असा मांडला विकासाचा पाढा

विकासाचा नवा टप्पा

शिवसेना (शिंदे गट) मधील अनेक अनुभवी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत संघटनेच्या ताकदीत भर घातली. यामुळे साकोली तालुक्यातील भाजप संघटन अधिक बळकट झाल्याचं स्पष्टपणे दिसून आले. पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. यामध्ये प्रकाशराणा शाम, पुरुषोत्तम टेंभरे, सुनिल टांडल, सुखलाल चौधरी, गोविंदा लांजेवार, सुभाष रोकडे, सुभाष मेश्राम (शहर उपप्रमुख, साकोली) आणि विश्वकर्मा सोनवणे यांचा समावेश आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि सुशासनावर विश्वास ठेवत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर श्रद्धा ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय बदल नाही, तर साकोलीच्या विकासयात्रेतील एक निर्णायक टप्पा ठरत आहे. या वेळी बोलताना डॉ. फुके यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत सांगितले, हा पक्षप्रवेश म्हणजे केवळ राजकीय शक्तीची भर नव्हे, तर विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची नवी सुरुवात आहे. ते पुढे म्हणाले, साकोलीत भाजप संघटनाच्या मजबुतीसाठी ही घडामोड ऐतिहासिक ठरणार आहे. अनुभवी कार्यकर्ते पक्षात येणं म्हणजे संघटनेच्या नव्या पर्वाची सुरूवात आहे.

Parinay Fuke : धान उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष्मीची कृपा, बोनस मिळाला…

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!